महापालिकेच्या गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत लक्षवेधी

महापालिकेच्या गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत लक्षवेधी

एमएमआरडीएच्या कथित घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेले गुन्हे आणि त्यामुळे ऐरणीवर आलेली रेन्टल स्किम तसेच संबधित विभाग प्रमुखांकडे असलेले कार्यभार आणि त्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांच्याकडे असलेल्या पदभाराचा कार्यकाळ या विषयी ठाणे पालिकेत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली आहे.

या बाबत काँग्रेस नगरसेवक आणि शहराध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांनी गुरुवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत लक्षवेधी मांडण्यात आली असून या लक्षवेधीला राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास देसाई यांनी अनुमोदन दिले आहे.
येत्या २० जानेवारीला ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभेत ही लक्षवेधी मांडण्यात आली असून यामध्ये प्रामुख्याने रेन्टल स्कीम बाबत विविध प्रश्न विचारून विकासकाकडून आणि एमएमआरडीएकडून किती घरे उपलब्ध झाली ? असे प्रश्न विचारून यात कोण कोणत्या अटी शर्ती होत्या, याबाबतही सवाल करण्यात आला आहे.

संबधित विभागाकडे हस्तांतरित झालेल्या लेखा-जोखा आणि वितरण करण्याची जबाबदारी कोणाची आहे, असा प्रश्न विचारून गुन्हे दाखल झाल्यामुळे स्थावर मालमत्ता, रेन्टल स्किम सुरक्षा विभाग यांचे विभाग प्रमुख कोण आहे ? असे विचारण्यात आले आहेत, अटक झालेले कर्मचारी कोणत्या विभागाशी संबंधित आहेत ? असे विविध प्रश्न विचारून संबधित गुन्ह्यांमध्ये बनविण्यात आलेले डुप्लिकेट चाव्या, डुप्लिकेट कागदपत्रे, चाव्यांचे काँप्युटराईज स्वरूप, सही शिक्याचे मूळ स्वरूप याची हुबेहूब नक्कल प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या सहभाग असल्याशिवाय होऊ शकते का ? असा प्रश्न विचारण्यात आला आहे, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

First Published on: January 18, 2022 8:54 PM
Exit mobile version