कल्याण स्टेशन परिसर रेड लाईट एरिया घोषित करण्याची मनसेची मागणी

कल्याण स्टेशन परिसर रेड लाईट एरिया घोषित करण्याची मनसेची मागणी
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांची भेट घेतली. कल्याण स्टेशन परिसरात दिवसा ढवळ्या व रात्री वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी व्यापलेला असतो. सर्वसाधारण नागरीक, महिलांना येथे उभे राहणे तर लांब तेथून चालण सुद्धा शक्य नसल्याने हा स्टेशन परिसर ‘रेड लाईट एरिया’ घोषीत करण्याची उपरोधिक अर्थाने मागणी यावेळी मनसेने केली.
स्टेशन परिसरात १५० मीटर “ना फेरीवाला झोन” असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे नेहमी आंदोलन करण्यात आले आहेत.  या परिसरात कायमस्वरूप व कडक कारवाई करावी. तसेच १५० मीटरची सीमा रेषा आखून द्यावी जेणे करुन त्यांच्या निदर्शनास येईल. काही बेशिस्त रिक्षावाल्यांमुळे स्टेशन परिसरात वाहतुक कोंडी नेहमीच असते. यामुळे चांगले रिक्षावाल्यांचे नाव खराब होते. तसेच  याकरीता तिन्ही विषयांवर वाहतूक पोलीस, महात्मा फुले पोलीस स्टेशन, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने योग्य ती कारवाई करत सर्वसामान्य नागरीकांना रोज होणारा त्रासापासून मुक्त करावे या मागण्या आयुक्तांकडे केली आहे.
मनसेच्या मागणी नुसार आयुक्तांनी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्यात यावी व दीडशे मीटरची हद्द (ना फेरीवाला क्षेत्र) स्टेशन परिसरात सीमा रेषा आखून द्यावी असे “क”प्रभाग क्षेत्र अधिकारी तुषार सोनवणे यांना आदेश दिले आहेत. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, म.न.वि.से शहर अध्यक्ष विनोद केणे, विभाग अध्यक्ष कपिल पवार, रोहन आक्केवार, शाखा अध्यक्ष समीर टाकळकर, गणेश लांडगे, महेश बनकर, मिलिंद चौधरी, गंगाधर कदम, सचिन सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
First Published on: May 26, 2023 10:47 PM
Exit mobile version