कल्याण-डोंबिवलीत अकरा प्रभागांची नव्याने भर 

कल्याण-डोंबिवलीत अकरा प्रभागांची नव्याने भर 
कल्याण डोंबिवली महानगरपालिका राज्य निवडणूक आयोगाला प्रभागांचा आराखडा सादर करणार असून नव्याने अकरा प्रभागांची भर त्यात पडणार असल्याचे वृत्त आहे. कोरोना कालावधीत निवडणूक पुढे ढकलल्याने राजकीय राजवट संपुष्टात येऊन प्रशासकीय कारभार कल्याण डोंबिवली मध्ये सुरू करण्यास प्रारंभ करण्यात आलेल्या गोष्टीला एक वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. केडीएमसीत त्रिसदस्यीय म्हणजेच पॅनल पद्धतीने निवडणुका होणार असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यास प्रारंभ केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचनेचा आराखडा दिल्यानंतर प्रभागरचना ग्राह्य धरली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
कल्याण-डोंबिवली क्षेत्रात नव्याने अकरा प्रभागांची भर पडली जाणार असून राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच पालिका प्रशासनाला प्रभाग रचनेचा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते . त्यामुळे पालिका अधिकारी प्रभाग रचनेच्या आराखड्याबाबत कामकाज करीत होती . ऑक्टोबर २०२० रोजी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार होती. निवडणूक आयोगाने पूर्वतयारी म्हणून प्रभाग रचनेचा आराखडा पालिकेकडून मागितला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत यावेळी ११ प्रभागांची नव्याने भर पडणार असून त्रिसदस्यीय पॅनल पद्धतीने निवडणूक होणार आहे . कल्याण पश्चिम मध्ये तीन, डोंबिवली पश्चिम मध्ये तीन तर पूर्वेत दोन तसेच कल्याण पूर्व दोन तर अन्य एका प्रभागात एक प्रभाग वाढणार असल्याचे वृत्त आहे.
First Published on: January 4, 2022 9:21 PM
Exit mobile version