केडीएमसीकडून एक लाख तीस हजारांचा दंड वसूल; २६४ नागरिकांची अँन्टीजन टेस्ट

केडीएमसीकडून एक लाख तीस हजारांचा दंड वसूल; २६४ नागरिकांची अँन्टीजन टेस्ट

Omicron Variant Test : ओमिक्रॉन चाचणीच्या पहिल्या Omisure किटला ICMR ने दिली मान्यता

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात रविवारी विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांकडून महापालिकेने तब्बल एक लाख ३० हजारांचा दंड वसूल केला आहे. या कारवाई दरम्यान २६४ नागरीकांची एन्टीजन टेस्ट करण्यात आली तर परवानगी नसतांनाही उघडण्यात आलेल्या १५ दुकानांना सील ठोकण्यात आले आहे.कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील १५ दिवसात कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी करणेबाबत तसेच रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँन्टीजन टेस्ट करण्याबाबतचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिका अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

या अनुषंगाने रविवारी पूर्ण दिवसभरात महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने महापालिका परिसरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून तब्बल एक लाख ३० हजारांचा दंड वसूल केला आहे. याच दरम्यान दिवसभरात सबळ कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या २६४ नागरिकांची अँन्टीजन टेस्ट करण्यात आली असून या तपासणीत सापडलेल्या एका पॉझिटिव्ह रुग्णास महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात तात्काळ दाखल करण्यात आले आहे.

नियमांचे उल्लंघन करीत परवानगी नसतांनाही उघडण्यात आलेली एकूण १५ दुकाने सीलबंद करण्यात आली असून त्यांच्याकडून ३५ हजारांच्या दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी शक्यतो सबळ आणि अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना न चुकता मास्क परिधान करावा आणि कोरोना विरुद्धच्या लढ्यात महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

 

 

First Published on: May 18, 2021 9:03 AM
Exit mobile version