ठामपातील उद्याने व मैदानांची वर्षानुवर्षे ठाम मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांमुळे दुरावस्था

ठामपातील उद्याने व मैदानांची वर्षानुवर्षे ठाम मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांमुळे दुरावस्था

एका बाजूला नवी मुंबई महानगरपालिकेची उद्याने सुस्थितीत असताना दुसऱ्या बाजूला ’ड“ वर्ग महानगरपालिका असलेल्या मिरा-भाइर्दर महानगरपालिकेची उद्याने मात्र सुस्थितीत आहेत. कारण या ठिकाणी महानगरपालिकेच्या उद्यानांची व मैदानांची निगा व देखभालीची जबाबदारी उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना न देता तेथे वार्षिक ठेकेदाराकडून ही उद्याने व मैदाने दुरूस्ती केली जातात. तर ठाणे महानगरपालिकेतील उद्यान व वृक्ष प्राधिकरणातील गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे दुरावस्था झाल्याचा आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी करत, त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना इतर खात्यामध्ये बदली करून हा विभाग कायमचा बंद करावा व मिरा-भाइर्दर महानगरपालिकेप्रमाणे वार्षिक ठेकेदारामार्फत या उद्याने व मैदानांची दुरूस्ती व देखभाल करावी, अशी मागणीही आमदार सरनाईक यांनी आयुक्त बांगर यांच्याकडे केली आहे.

ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये अनेक उद्याने व मैदाने असून त्यांची देखभाल व दुरूस्ती महानगरपालिकेचे उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी करीत असतात. परंतू, गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना माझ्या असे निर्दशनास आले की, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नवीन उद्याने व दुरूस्तीच्या निविदा तसेच विकासकांच्या माध्यमातून झाडे तोडण्यासाठी आलेल्या कामांव्यतिरिक्त दुसऱ्या कामांमध्ये म्हणजेच उद्याने व मैदाने यांची योग्य प्रकारे निगा व काळजी घेण्याची इच्छा नसल्याचे जाणवते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण नसल्याने तसेच कामचुकारपणा या कर्मचाऱ्यांमध्ये वाढल्याने महानगरपालिका हद्दीतील उद्यानांची व मैदानांची दुरावस्था झाल्याचा आरोप सत्ताधारी आमदार आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. तसेच याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

ठाणे महानगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न अतिशय चांगले नसताना देखील कोरोनाच्या भीषण परिस्थितीनंतर अभिजित बांगर यांनी आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून करोडो रूपयांचे कर्ज फेडून महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा आणत आहात. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराच्या सुशोभिकरणासाठी करोडो रूपयांचा निधी दिलेला आहे. राज्य शासनाने दिलेल्या निधीचा योग्य प्रकारे वापर करीत असताना उद्यान विभागामार्फत मात्र आपणांस सहकार्य मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काही अधिकारी ठाण मांडून बसले आहेत असा आरोप करत त्या अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणामुळे ठाणे महानगरपालिकेची वारंवार बदनामी होत आहे.

असे ही आमदार सरनाईक यांनी म्हटले आहे. ठाणे शहराचे लोकप्रतिनिधी म्हणून उद्यानांचे उद्घाटन केल्यानंतर त्यांच्या दोन-तीन महिन्यानंतरच त्यांची दुरावस्था झालेली आढळून येत आहे. महानगरपालिकेच्या इतर उद्यानाच्या दुरावस्थेबरोबरच मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या कळवा येथील स्व. उत्तमराव पाटील निसर्ग संरक्षण व जैवविविधता उद्यान तसेच घोडबंदर रोडवरील ’जुने ठाणे नविन ठाणे“ तसेच रूणवाल प्लाझा शेजारील बॉलीवुडच्या थिमपार्कच्या दुरावस्थेकरिता सुध्दा हेच उद्यान विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. अशी टीका ही आमदार सरनाईक यांनी केली.  करोडो रूपये खर्च करून महानगरपालिका उद्याने उभारत असताना ठेकेदाराकडून ती उद्याने तयार करून महानगरपालिकेकडे सुपूर्द केल्यानंतर वर्षभरातच त्या उद्यानामध्ये नागरिकांना जावेसे वाटत नाही, अशी अवस्था होत असते ही बाब ही आमदार सरनाईक यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

First Published on: May 26, 2023 10:35 PM
Exit mobile version