भिवंडीत शौचालयाचा भाग कोसळला

भिवंडीत शौचालयाचा भाग कोसळला
भिवंडीत  एमएमआरडीएच्या निधीतून महानगरपालिकेने शहरात विविध ठिकाणी शौचालय बांधले आहेत. त्यापैकी गायत्रीनगर येथील गणेश किराणा स्टोअरच्या शेजारील शौचालयाचा काही भाग बुधवारी दुपारी ३ वाजता एका कोसळला आहे. सुदैवाने या वेळी त्या शौचालयात कोणीही नसल्याने नागरिक जखमी झाले नाही.
  भिवंडी महानगरपालिका हद्दीत मोठ्या संख्येने कामगारवर्ग झोपडपट्टी भागात राहत आहे. या परिसरासाठी १० वर्षांपूर्वी एमएमआरडीएच्या निधीतून शहरात २०७ शौचालये बांधले आहेत. हे शौचालय बांधताना व ते परिचालनासाठी देताना मोठ्या संख्येने भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शासनाच्या स्वच्छता अभियानांतर्गत या शौचालयांची चार वर्षांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र ही दुरुस्ती तकलादू  ठरली आहे. असे आज घडलेल्या घटनेवरून सिद्ध झाले आहे. तसेच काही सार्वजनिक शौचालयाचे परिचालक पळून गेले असून या बाबत पालिकेचे बांधकाम विभाग व स्वच्छता विभाग दुर्लक्ष करीत आहे.
गायत्रीनगर मधील गणेश किराणा शेजारील शौचालय एक मजली ते २४ सिटचे आहे. तळमजल्यावर महिला व पहिल्या मजल्यावर पुरुष अशाप्रकारे स्थानिक नागरिक वापर करीत आहे. या शौचालयाचे परिचालक पळून गेल्याने एक अपंग या शौचालयाची देखभाल करीत आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार या शौचालय बांधकामाची दुरुस्ती करण्याची मागणी केली. मात्र पालिकेच्या बांधकाम अधिकाऱ्यांनी या कडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने यावेळी त्या शौचालायात कोणी नसल्याने कोणीही जखमी झाले नाही. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा धोकादायक शौचालयाचा इमारतीमध्ये प्राणहानी झाल्यावर पालिकेचे अधिकारी लक्ष देणार काय ? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.
First Published on: May 12, 2021 10:27 PM
Exit mobile version