पट्टेरी वाघाची कातडी आणि पंज्याची तस्करी करणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक

पट्टेरी वाघाची कातडी आणि पंज्याची तस्करी करणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक

पट्टेरी वाघाची कातडी आणि पंज्याची तस्करी करणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक

राष्ट्रीय वन्यजिव प्राण्याची म्हणजेच “पट्टेरी वाघ”चे कातडी व पंज्याचे तस्करी करणारी टोळी कोनगाव पोलिसांच्या जाळयात अडकली आहे. या तस्करांकडून लाखोंचा मुद्देमालही जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रशांत सुशिलकुमार सिंग, (वय २१, रा. वडाळा पुर्व, मुंबई) चेतन मंजे गौडा (वय २३ रा.वडाळा, मुंबई) आर्यन मिलींद कदम (वय २३ रा. वडाळा पुर्व, मुंबई ) अनिकेत अच्युत कदम ( वय २५ रा. सायन कोळीवाडा, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत. भिवंडी तालुक्यातील नाशिक-मुंबई बायपास महामार्गावर ठाकुरपाडा गावाच्या हद्दीतील बासूरी हॉटेलचे समोर काही तस्कर “पटटेरी वाघ” या वन्यजिव प्राण्याचे कातडे व पंजा विक्री करणेकरीता येणार असल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांना मिळाली होती.

त्याअनुषंगाने कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक, अभिजीत पाटील यांनी वन विभागाचे कर्मचारी व वॉर रेस्क्यु फाउंडेशन वन्यजिव अभ्यासक सुहास पवार व योगेश कांबळे यांचेसह सापळा रचुन या चार जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात वन्यजिव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ९, ३९(३), ४४, ४८(अ), ४९(बी), ५१ प्रमाणे दाखल करून लाखो रुपये किंमतीचे “पट्टेरी वाघ” या राष्ट्रीय वन्यजिव प्राण्याचे सोलुन काढलेले, कडक झालेले व सुकलेले काळया व पिवळया पट्टे असलेले कातडे, व “पट्टेरी वाघ’ या राष्ट्रीय वन्यजिव प्राण्याचा पाच नखे असलेला पंजा असा मुददेमाल हस्तगत केला आहे.

लाखो रुपये किंमतीचे पट्टेरी वाघाचे कातडे कुठून आणले व कोणाला विक्री करण्यासाठी मुंबई वरून मुंबई – नाशिक महामार्गावर आले होते याचा तपास सुरु पोलिसांनी सुरु केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी दिली आहे. तर पोलीस उप निरीक्षक पराग भाट, सहा. पोलीस उप निरीक्षक, वामण सुर्यवंशी, पो.हवा राजेश शिंदे, संतोष मोरे, पो.ना विनायक मासरे, संतोष पवार, अविनाश पाटील, अशोक ढवळे, कृष्णा महाले व गणेश चोरगे या पोलीस पथकाने तस्करांना पकडण्यासाठी सापळा रचला असुन या गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील करीत आहेत.

 

 

First Published on: April 21, 2021 9:36 PM
Exit mobile version