ठाण्यात देहविक्री करणाऱ्या हॉटेलवर पोलिसांचा छापा

ठाण्यात देहविक्री करणाऱ्या हॉटेलवर पोलिसांचा छापा

ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. ठाण्यात देहविक्री करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठाण्याच्या ‘कॅपिटॉल’ हॉटेलमधून हा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. देहविक्रीसाठी हॉटेल ‘कॅपिटॉल’च्या एका खोलीत दोन मुलींना ठेवण्यात आले होते. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी या मुलींची सुटका केली आहे. या तपासादरम्यान कॅपिटॉल हॉटेलमध्ये चालणारा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या विरोधात चितळासर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्याच्या घोडबंदर रोड जवळील माजीवाडा येथे कॅपिटॉल नावाचे एक हॉटेल आहे. या हॉटेलच्या खोलींमध्ये दोन तरूणींना देहविक्रिसाठी ठेवण्यात आले होते. हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला मिळाली. त्यानुसार गुरूवारी संध्याकाळी पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून दोन मुलींची त्यातून सुटका केली.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने टाकलेल्या या छाप्यात हॉटेलच्या खोली क्रमांक २०८मध्ये दोन तरूणींना ठेवण्यात आले होते. पोलिसांनी छापा टाकून दोन्ही तरूणींची सुटका केली. या प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली आहे. अफसानाबीबी उर्फ जान्हवी अब्दुला लष्कर असे त्या महिलेचे नाव आहे. ३३ वर्षांच्या या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्याविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात पिठा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. अफसानाबीबी हि तरूण मुलींना पैशांचे आमिश दाखवून त्यांना फसवत होती. मुलींना फसवून त्यांची देहविक्री करून पैसे कमवण्याचा तिचा व्यवसाय होता. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ग्राहकांना मुली पुरवत असल्याचे पोलीस चौकशीत उघडकीस आले आहे.


हेही वाचा – नवजात अर्भक कचराकुंडीत फेकून मावशीने काढला पळ

 

First Published on: December 11, 2020 9:17 PM
Exit mobile version