वीज पुरवठा खंडीत झाल्याचा फटका; ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्याला २५ एमएलडी कमी पाणी पुरवठा

वीज पुरवठा खंडीत झाल्याचा फटका; ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्याला २५ एमएलडी कमी पाणी पुरवठा

तौक्ते चक्री वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पावसाचा फटका ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाला बसला. शहाड येथील स्टेम प्राधिकरणाच्या केंद्राचा वीज पुरवठा अचानक मध्यरात्री ३.३० वाजण्याच्या सुमारास खंडीत झाला आणि त्याचा परिणाम संपूर्ण ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला. ठप्प झालेला पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी सकाळचे ११ वाजून गेले होते अशी पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले.चक्रीवादाळाचा फटका ठाण्यासह इतर भागांना देखील बसल्याचे चित्र रात्री पासूनच दिसून आले. शहाड येथील स्टेम प्राधिकरणाला देखील याचा फटका बसल्याचे दिसून आले.रात्री ३.३० वाजताच्या सुमारास वीज पुरवठा खंडीत झाल्याने त्याचा परिणाम पाणी पुरवठय़ावर देखील झाला. ठाणे शहराला जवळ जवळ सगळ्याच भागांमध्ये स्टेमच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.

परंतु वीज पुरवठा खंडीत झाल्याने त्याचा परिणाम पाणी पुरवठय़ावर देखील झाल्याचे दिसून आले. परंतु स्टेम प्राधिकरणाच्या वतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यानंतर दोन तासाने वीज पुरवठा सुरळीत झाला. परंतु ठाणे महापालिकेला पाणी पुरवठा होई र्पयत वेळ लागला. त्यानंतर सकाळी ११ च्या सुमारास सुरळीत पाणी पुरवठा झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी विनोद पवार यांनी सांगितले. परंतु शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा झाल्याचे दिसून आले. तर शहराला या वीज पुरवठा खंडीत होण्यामुळे २५ दशलक्ष लीटर कमी पाणी पुरवठा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

First Published on: May 18, 2021 8:42 AM
Exit mobile version