ठाण्यात कोरोना ऐवजी दिली रेबीजची लस; डॉक्टरासह परिचारिका निलंबित

ठाण्यात कोरोना ऐवजी दिली रेबीजची लस; डॉक्टरासह परिचारिका निलंबित

ठाण्यात लस घेण्यासाठी गेलेल्या एका महिलेला घोडबंदर रोडवरील केंद्रावर तीन वेळा सुई टोचल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. सोमवारी कळव्यात लस घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला कोरोना लस ऐवजी रेबीज लस दिली गेली आहे. याप्रकरणाची ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी दाखल घेत तातडीने मंगळवारी बैठक बोलवून यातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने त्या केंद्रावरील डॉक्टरासह लस देणाऱ्या परिचरिकेवर निलंबनाची कारवाई केली आहे. तर ,रेबीज लस दिलेल्या व्यक्तीची प्रकृती उत्तम असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून ठामपामध्ये निलंबनाचे सत्र सुरूच आहे.

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या कळवा, आतकोनेश्वर नगर भागात महापालिकेचे आरोग्य केंद्र आहे. त्या केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्या केंद्रांवर एका व्यक्तीला कोरोना लसीऐवजी रेबीजची लस देण्यात आल्याची बाब पुढे आली.

या घटनेचे माहिती मिळताच गांभीर्य लक्षात घेत, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, मंगळवारी महापौर दालनात महापालिकेच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. अशा वारंवार घडणाऱ्या घटनेमुळे महापालिकेची नाहक बदनामी होत आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून येथील डॉक्टरासह परिचरिकेला निलंबन करण्यात आले आहे.कोरोना लस ऐवजी रेबीज लस दिल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे. तर ज्या व्यक्तीला रेबीजची लस दिली गेली आहे.त्या व्यक्तींची प्रकृती उत्तम आहे. तसेच या प्रकरणी डॉक्टर आणि एका परिचरिकेला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती ठामपा अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली.


Vaccines for children : केंद्राने सीरम इन्स्टिट्यूटला लहान मुलांवर चाचणी करण्यास दिली मंजुरी

First Published on: September 28, 2021 5:44 PM
Exit mobile version