ठाण्यात इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

ठाण्यात इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

कठोर नियमावलीमुळे गेली अनेक वर्षे जुन्या ठाण्यासह राज्यभरातील दाटीवाटीच्या वस्तीमधील जुन्या इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकासाचा मार्ग अखेरीस मोकळा झाला असून सुधारित नियमावलीला मंजुरी दिल्याची घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केली.

या सुधारित नियमांमुळे पुनर्विकासासाठी अधिक एफएसआय उपलब्ध होणार असून अनेक किचकट नियमांमध्ये सुटसुटीतपणा आणण्यात आला आहे. त्यामुळे पुनर्विकासाचे प्रकल्प विकासक आणि रहिवासी या दोघांसाठीही व्यवहार्य ठरणार असल्याने पुनर्विकासाला गती मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी केला.

नगरविकास विभागाने गेल्या वर्षी ३ डिसेंबर रोजी मुंबई वगळता राज्यभरात एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युनिफाइड डीसीपीआर – यूडीसीपीआर) लागू केली. या नियमावलीबाबतच्या मार्गदर्शक पुस्तिकांचे (एफएक्यूज आणि इलस्ट्रेटिव्ह मॅन्युअल) प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये झाले. राज्याचा नगरविकास विभाग आणि एमसीएचआय क्रेडाई यांच्या संयुक्त वतीने आयोजित या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना शिंदे यांनी दाटीवाटीच्या वस्त्यांमधील जुन्या, तसेच धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासात असलेले अडथळे दूर करण्यात आल्याची घोषणा केली.

First Published on: November 27, 2021 4:04 AM
Exit mobile version