दिव्यातील गणेश मंडळांसमोर रस्ते दरुस्ती, कचऱ्यांच्या ढिगाचे विघ्न

दिव्यातील गणेश मंडळांसमोर रस्ते दरुस्ती, कचऱ्यांच्या ढिगाचे विघ्न

india corona update monsoon update maharashtra coronavirus section 144 omicron 12 december 2021 PM Modi Twitter accout hack sharad pawar birthday

ठाणे – गणेशोत्सव जवळ आला असला तरीही दिव्यात अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्तीचं काम सुरू आहे. तसेच, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्याने गणेश मंडळ आणि भक्तांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी वेळेत खबरदारी घेण्याच्या सूचना द्यावात अशी मागणी दिवा भाजपच्या महिला मंडळ अध्यक्ष ज्योती पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा – नगर विकास विभागाने दिले १८३ कोटी, ठाणे मनपाने घातले ‘खड्ड्यात’!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिव्यात अनेक सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे. काही मंडळांनी गणरायाच्या आगमनाची सुरुवात केली आहे. सर्व गणेश भक्तांच्या आनंदावर मानवी चुकांमुळे कोणतेही विरजण पडणार नाही, यंत्रणांच्या दुर्लक्षपणामुळे कोणताही अपघात होणार नाही, यासाठी महापालिकेने दिवा प्रभाग समितीच्या माध्यमातून उपाययोजना कराव्यात.

हेही वाचा – राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, भास्कर जाधव स्पष्टच बोलले

रस्त्याच्या लगत असणारे विजेचे खांब, विजेच्या तारा याची योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित विभागांना द्याव्यात. त्याचबरोबर दिवा शहरातील अंतर्गत रस्त्यांचे खड्डे वेळेत बुजवावेत. दिवा शहरात गणेश उत्सवाच्या काळामध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी दिवा स्टेशन, दिवा टर्निंग आणि गणेश नगर भागात ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या महिला मंडळ अध्यक्ष पाटील यांनी केली आहे.

First Published on: August 24, 2022 6:43 PM
Exit mobile version