विकासकाशी करार केलेल्या जमिनीची विक्री, 7 जणांवर गुन्हा दाखल

विकासकाशी करार केलेल्या जमिनीची विक्री, 7 जणांवर गुन्हा दाखल

तालुक्यातील गोवे गावातील सात शेतकर्‍यांनी आपल्या जमिनीवरील सरकारी बोजा काढून त्याचा मोबदला म्हणून ठराविक रक्कम घेऊन करारानुसार जमीन विकसित करण्यासाठी न देता त्यापैकी काही जमिनीची परस्पर विक्री केल्याने विकासकाने सात शेतकर्‍या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सन 2019 मध्ये मौजे गोवे गावातील एकूण 165 गुंठे क्षेत्रफळ असलेल्या जमिनीवर महाराष्ट्र सरकारने एम.आय.डी.सी करिता भूसंपादनकेले आहे. हा बोजा हटविण्याच्या मोबदल्यात सदर जमीन भूखंड विकास करारनामा,कुलमुखत्यार पत्राद्वारे आणि नोटरी करारनामा द्वारे विकसित करण्यासाठी 7 जणांनी बांधकाम व्यावसायिकाकडून तब्बल 71 लाख रुपये मोबदला स्वरूपात सन 2019 पासून 2023 पर्यंत घेतले आहेत.

मात्र असे असतानाही या आरोपीत 7 शेतकर्‍यांनी आपसात संगनमत करून सदर जमीन हरेश रामचंद्र सोभानी या बांधकाम व्यावसायिकाला विकासाकरिता न देता या 165 गुंठे जमिनीपैकी 20 गुंठे जमीनीची परस्पर दुसर्‍या व्यक्तीला विक्री करून यामधील 101 गुंठे जमीन बक्षीस पत्रान्वये हस्तांतरित केली आहे.त्यामुळे हरेश रामचंद्र सोभानी (68 रा.अंधेरी,मुंबई) यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात विष्णू रामचंद्र पाटील,अनिल विष्णू पाटील,मीना जयवंत शेलार,अलका विजय म्हात्रे,गुलाब शैलेश पाटील,सखाराम दत्तात्रेय मुकादम,मोनिका अनिल पाटील या 7 शेतकर्‍यांविरोधात फसवणूकीची फिर्याद दिली असून पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिकारी एन. बी.गिरासे करीत आहेत.

First Published on: May 8, 2023 9:41 PM
Exit mobile version