सात वर्षीय चिमुरडा तोल जाऊन कळवा खाडीत पडला; सायकल चालवताना घडला प्रकार

सात वर्षीय चिमुरडा तोल जाऊन कळवा खाडीत पडला; सायकल चालवताना घडला प्रकार

ठाणे: साकेत खाडीत तोल जाऊन एक युवक पडल्याची घटना ताजी असताना, आता सायकल चालवताना तोल जाऊन कळवा खाडीमध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियम जवळील नागसेन नगर येथील सात वर्षीय रीशी उस्वा हा चिमुरडा पडल्याची घटना बुधवारी दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. त्याचा शोध सुरू असून तो अद्यापही मिळून आलेला नाही.

रीशी हा मुलगा खाडी शेजारी असलेल्या घरावर सायकल चालवत असताना तोल जाऊन कळवा खाडीमध्ये पडला. अशी माहिती मिळताच, घटनास्थळी ठाणे नगर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठाणे अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान यांनी धाव घेत, तात्काळ शोधकार्य हाती घेतले. मात्र रीशी अद्यापही मिळून आलेला नाही अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

First Published on: July 13, 2022 11:09 PM
Exit mobile version