ठाणे पालिका आयुक्तांच्या बंगल्याचे श्री स्थानक नामकरण

ठाणे पालिका आयुक्तांच्या बंगल्याचे श्री स्थानक नामकरण

ठाणे पालिका आयुक्तांच्या बंगल्याचे श्री स्थानक नामकरण

ऐतिहासिक वारसा असलेल्या ठाणे शहराचे नामकरण श्री स्थानक करावे अशी इतिहासप्रेमी ठाणेकरांची फार पूर्वी पासून जी होती, त्यामुळे जरी ठाणे शहराचे नामकरण झाले नसले तरी ठाणे महापालिकेने प्रशासन प्रमुख असलेल्या पालिका आयुक्तांच्या निवासस्थानाचे नामकरण श्री स्थानक असे करून इतिहास प्रेमी ठाणेकरांना काहीसा दिलासा दिला आहे. ठाणे रेल्वे स्थानकाचे नामकरण श्री स्थानक करावे अशी इतिहासप्रेमी ठाणेकरांची मागणी अद्यापही आहे. मात्र त्याला जरी अद्याप ठाण्यातील राजकीय मंडळींकडून पाठबळ मिळालेले नसले तरी ठाणे महापालिकेने मात्र ठाण्यातील इतिहास प्रेमींची मागणी लक्षात घेऊन ठाणे पालिकेच्या प्रशासनाचे प्रमुख असलेल्या महापालिका आयुक्तांच्या घोडबंदर रस्त्यावरील पातलीपाडा येथील शासकीय निवासस्थानाचे नामकरण श्री स्थानक करून इतिहास प्रेमी ठाणेकरांना सुखद धक्का दिला आहे.

पातलीपाडा येथे सुमारे तीस वर्षांपासून पालिका आयुक्तांसाठी निवास स्थान म्हणून हा बंगला बांधण्यात आला होता. साधारणपणे दोन-तीन वर्षांतून पालिका आयुक्तांच्या या निवासस्थानाचे नूतनीकरण करण्यात येत असते. आत्तापर्यंत अनेक ज्येष्ठ व नावाजलेले भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ सनदी अधिकारी ठाण्याला पालिका आयुक्त म्हणून लाभलेले आहेत. त्यामुळे ठाणे पालिका आयुक्तांच्या दर्जाला साजेसे असे हे निवासस्थान असावे असा प्रयत्न ठाणे पालिकेचा नेहमीच असतो त्यातूनच गेल्यावर्षी पालिका आयुक्तांच्या या निवासस्थानाची दुरुस्ती डागडुजी तसेच नूतनीकरण करण्यात आले.नूतनीकरण झाल्यानंतर निवासस्थानाबाहेर यापूर्वी असलेला ठाणे महापालिका आयुक्तांचे निवास्थान अशा नामकरणाचा फलक बदलून आता तेथे श्री स्थानक असे नामकरण करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

First Published on: May 5, 2021 5:47 PM
Exit mobile version