ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये लक्षणीय वाढ

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये लक्षणीय वाढ

ठाणे जि्ल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये लक्षणीय वाढ

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूत  भर पडली आहे. ठाणे जिल्ह्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात आज दिवसभरात पाच हजार ४४१ रुग्णांची भर असून ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या चार लाख ३६हजार ९२झाली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या७१३०अशी आहे. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. ठाणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या आढळण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. ठाणे शहरात आज १४५८ रुग्णांची वाढ झाली असून ठाणे शहरातील एकूण रुग्ण संख्या १ लाख ११ हजार ६३२ झाली आहे. ठाणे शहरात आज अकरा मृत्यू झाल्याने मृत्यूंची संख्या एकूण 1588 नोंदवली गेली आहे.

कल्याण-डोंबिवलीत ही १६७० रुग्णांची वाढ झाली असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली शहरात एक लाख ११ हजार ६०६ रुग्ण सक्रिय असून १३५२ मृत्यू झाले आहेत. उल्हासनगर मध्ये १८० रुपये सापडले असून येथे एकही मृत्यू झालेला नाही. उल्हासनगर मधील कोरणा बाधित यांची संख्या 17 हजार ८३९ झाली असून ४०२ मृत्यूंची नोंद आहे. भिवंडीला ८२ बाधित असून ३ मृत्यू झाले आहेत. मीरा-भाईंदर मध्ये आज 479 रुग्ण आढळले असून ११ जणांचा मृत्यू झालेला आहे.  शहरांमध्ये बाधितांची एकूण संख्या १८९५ हजार १८० असून एकाचा मृत्यू झाल्याने अंबरनाथ मधील एकूण मृत्यूची संख्या ३५१ इतकी झाली आहे. बदलापूर मध्ये २४९ रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झालेले आहे. त्यामुळे बाधीतांची  १७ हजार १४७ नोंदवली असून मृत्यूंची संख्या १४९ आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २७८ रुग्णांचे वाढ झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण बाधित २४हजार २६३ असून त्यामध्ये ६४८ मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आहे.

First Published on: April 22, 2021 11:17 PM
Exit mobile version