ठामपाच्या कॉल सेंटरमधून बुस्टर डोससाठी कॉल

ठामपाच्या कॉल सेंटरमधून बुस्टर डोससाठी कॉल

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात १०० टक्के ठाणेकर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधित लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस घेण्याची टक्केवारी ८७ टक्के इतकी आहे. त्यातच, बुस्टर डोस घेण्याची संख्या ही आता कुठे लाखभर झाल्याने पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्या ठाणेकर नागरिकांना त्यांच्या मोबाईल नंबरवर ठाणे महापालिका कॉल सेंटरवरून फोन केला जात आहे. तसेच त्यांना हॅलो.. सर किंवा मॅडम आपण बुस्टर डोस घेतला आहे का? अशी काळजीने विचारणा घेतला नसले तर बुस्टर डोस घेण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. त्यातच हर घर दत्तक या मोहिमेंतर्गत आता औद्योगिक क्षेत्रात देखील पुढील आठवडय़ापासून बुस्टर डोस शिबीर आयोजित केले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

केंद्र सरकारकडून कोविड लस अमृत महोत्सव अंतर्गत पुढील ७५ दिवस बूस्टर डोस मोफत देण्यात येणार आहे. त्यानुसार ठाणो महापालिकेच्या माध्यमातून ३२ आरोग्य केंद्रावर ही मोहीम सुरु केली आहे. तसेच कॅम्पच्या माध्यमातून व हर घर दस्तक मोहीमेच्या माध्यमातून देखील पालिकेच्या पथकाने घरोघरी जाऊन बुस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी दिवसभरात ३ हजार ९०८ जणांना बुस्टर डोस देण्यात आला आहे. तर १७ लाखांचे लक्ष निर्धारीत करण्यात आले असून त्यानुसार आतापर्यंत ९७ हजार ५३६ नागरीकांनी बुस्टर डोस घेतल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

ठामपा हद्दीत १७ लाख ९ हजारांचे लक्ष निर्धारीत केल्यापैकी आतापर्यंत १६ लाख ७० हजार नागरिकांचे लसीकरण हे ठाण्यात झाले असून उर्वरित ३९ हजार नागरीकांनी ठाण्याबाहेर लसीकरण करून घेतले आहे. अशी माहिती महापालिकेने जमा केला. त्यामुळे १०० टक्के ठाणेकरांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १४ लाख २६ हजार ३०२ एवढी असून हे प्रमाण ८७ टक्के असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

घरोघरी जाऊन केले ४८ हजार जणांना लसवंत
महापालिकेने हर घर दस्तक ही मोहीम सुरु केली असून त्याच्या दुसऱ्या टप्यातही घरोघरी जाऊन लसीकरण केले जात आहे. त्यानुसार आतापर्यंत या मोहीमे अंतर्गत ४८ हजार ५५६ नागरिक लसवंत झाले आहेत. यामध्ये अपंग, आजारी, वयोवृद्ध अशा नागरिकांचा समावेश आहे.

“महापालिकेच्या कॉल सेंटरकडे दोन डोस घेतलेल्यांचे मोबाइल क्रमांक आहेत. त्यातच या सेंटरच्या माध्यमातून आता बुस्टर डोस घेतला का नाही? याची विचारणा करण्यासाठी कॉल देखील केले जात आहेत.तर, पुढील आठवडय़ापासून वागळे औद्योगिक केंद्र, टीसीएस अशा सारख्या औद्योगिक ठिकाणांवर देखील बुस्टर डोसची मोहीम राबविण्यात येणार आहे. ”
– मनीष जोशी, उपायुक्त,ठामपा

First Published on: July 19, 2022 9:10 PM
Exit mobile version