ठाणेकर नागरिकांसाठी 10 ठिकाणी तणावमुक्त केंद्र

ठाणेकर नागरिकांसाठी 10 ठिकाणी तणावमुक्त केंद्र

ठाणेकर नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे, तसेच ताण तणावातून मुक्तता मिळावी यासाठी ठाणे महापालिकेने तणावमुक्त केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे केंद्र प्रामुख्याने प्रत्येक प्रभाग समिती सुरू करण्यात येणार असून यासाठी दहा शाळांची निवड केली जाणार आहे. तसेच 50 लाखांची तरतूद अर्थसंकल्पात प्रस्तावित केल्याची माहिती महापालिकेच्या एका अधिकार्‍याने दिली.

कोरोना कालावधीत नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. त्यामुळे ताणतणाव ही वाढू लागला आहे. तसेच लाईफ स्टाईलही बदलू लागली आहे. यामुळे आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. त्यातच आजारांची तीव्रता कमी राहण्यासाठी आणि त्याला वेळीच आळा घालण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने तणावमुक्त केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तब्बल 50 लाखांची प्रस्तावित तरतूद केली आहे. या केंद्रात व्यायाम आणि योगावर ही भर दिला जाणार आहे. तसेच येथे तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन ही केले जाणार आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी केली जाणार असून त्यांनी याला हिरवा कंदील दाखवल्यावर हे केंद्र लवकरात लवकर करण्याचा मानस आरोग्य विभागाने वर्तवला आहे.

ही लोकप्रतिनिधींची मागणी होती. त्यानुसार ठामपा कार्यक्षेत्रात 10 ठिकाणी तणावमुक्त केंद्र लवकरच सुरू होतील.- मनीष जोशी, उपायुक्त,वआरोग्य विभाग, ठामपा

First Published on: March 14, 2022 9:16 PM
Exit mobile version