ठाण्यात विनाकारण फिरणाऱ्यावर कठोर कारवाई

ठाण्यात विनाकारण फिरणाऱ्यावर कठोर कारवाई

ठाण्यात विनाकारण फिरणाऱ्यावर कठोर कारवाई

संपूर्ण राज्यासह ठाण्यात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाण्यातही वीकेण्ड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच विनाकारण बाहेर फिरण्याऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश पोलिस प्रशासनास देण्यात आले होते. याच अनुषंगाने आज ठाण्यात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय जे दुचाकीस्वार विनाकारण बाहेर पडतात त्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.संपूर्ण राज्यासह ठाण्यातदेखील कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढ झाली आहे. कोरोनाच्या मृत्यू संख्येतही भर पडलेली आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चैन’ मिशन अंतर्गत राज्यात गेल्या आठवड्यात मिनी लॉकडाऊन जाहीर केलं होतं.

त्यानंतर विकेंडला म्हणजेच शनिवारी-रविवारी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. काल याबद्दल बोलताना ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी नियमांचे पालन करण्यात यावे व तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवरती आज ठाण्यात प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत होता. ठाण्यात मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. परंतु जे लोक विनाकारण बाहेर फिरत होते त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या दुचाकीदेखील जप्त करण्यात आल्या आहेत.

ठाणे शहरातील तीन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. जे विनाकारण बाहेर फिरतात त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येत आहे व जे अत्यावश्यक सेवेत नसतानाही बाहेर पडतात त्यांच्यावर भारतीय कलम-79 च्या अंतर्गत नियम भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे.रिक्षामध्ये देखील फक्त दोन प्रवाशांना बसण्याची मुभा आहे. प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यामध्ये प्लास्टिकचे छत असणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोणीही विनाकारण बाहेर पडू नका मास्कचा वापर करा आणि अत्यावश्यक सेवा असेल, अतिशय गरज असेल तरच बाहेर पडा, असे आव्हान पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी केले.

First Published on: April 10, 2021 7:19 PM
Exit mobile version