कल्याणमध्ये विद्यार्थ्यांची गांधीगिरी! शालेय साहित्य न मिळाल्याने शिक्षण विभागाचा केला सत्कार

कल्याणमध्ये विद्यार्थ्यांची गांधीगिरी! शालेय साहित्य न मिळाल्याने शिक्षण विभागाचा केला सत्कार

कल्याण – शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिने उलटले तरी कल्याण येथील पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित असल्याने शिक्षणासाठी अडचणी येत आहेत. दरम्यान, याविरोधात विद्यार्थ्यांनीच गांधीगिरी अवलंबत शिक्षण विभागाचा सत्कार केलाय. या विद्यार्थ्यांनी कल्याण पूर्वेतील पत्री पूल ते सहजानंद चौक येथील शिक्षण मंडळ कार्यालयावर मोर्चा काढत शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ आणि गुलाबाचे फुल देत उपहासात्मक सत्कार केला.

हेही वाचा – ठाण्यात १९२ पैकी १९ गणेशोत्सव मंडळांनाच परवानगी, ऑफलाइन अर्जांमुळे प्रक्रिया रखडली

यावेळी माजी नगरसेवक कैलास शिंदे, नरसिंग गायसमुद्रे, युसुफ मेमन, संतोष वाघमारे, अजय कोठारे, रवी जयस्वाल, राजेश गरासे, श्रीकांत कोठूरकर, शेख सय्यद मुजावर, भारती जाधव, उर्मिला पवार, सनम शेख, नशिमा शेख, मदिना पटेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आताच साजरा केला. कल्याण डोंबिवलीतील महापालिकेच्या शाळा सुरू होऊन १०० दिवस पूर्ण झाले तरी सुद्धा केडीएमसी शाळेतील ६ हजार गरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके, गणवेश, रेनकोट, बूट, इतर शालेय साहित्य अजून मिळाले नाही. म्हणून शिक्षण मंडळाच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत शिक्षण मंडळातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा उपहासात्मक सत्कार केला असल्याचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा – सार्वजनिक गणेशोत्सवासाठी भिवंडी महापालिका सज्ज, पोलिसांकडूनही सूचना

First Published on: August 23, 2022 6:49 PM
Exit mobile version