मेट्रो कारशेडच्या सर्वेक्षणाला सुरुवात

मेट्रो कारशेडच्या सर्वेक्षणाला सुरुवात

एमएमआरडीएने मेट्रोच्या कारशेडसाठी टाकलेल्या आरक्षणामुळे या शेतकऱ्यांवर झालेल्या अन्याय लक्षात घेत, बुधवारी ओवळा माजीवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेत, त्या शेतकऱ्यांच्या अडचणीसह काही मागण्या मांडल्या. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यातच मेट्रो कारशेडच्या मार्गातील अडथळे सुटल्याने  या जागेचे सर्व्हेक्षणाचे काम आता सुरू होणार आहे.

बुधवारी आमदार सरनाईक यांनी एम.एम.आर.डी.ए.चे आयुक्त श्रीनिवासन व ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या भेटीत शेतकऱ्यांनी विविध मागण्या केल्या. जी जमिन शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्यामध्ये भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आरक्षण न राहता पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या खारफुटीच्या जागे व्यतिरिक्त फ्री होल्ड जमिन रेसिडेन्सीयल झोनमध्ये शेतकऱ्यांच्या नावे करून द्यावे, आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. या सर्व शेतकऱ्यांच्या सुचना जिल्हाधिकारी आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्या असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.  त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मेट्रो कारशेडचा तिढा सुटण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: January 19, 2022 8:38 PM
Exit mobile version