थड्याच्या पाड्यातील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार

थड्याच्या पाड्यातील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार

Water scarcity

पुरेसे पाणी असूनही विजेच्या समस्येमुळे बंद स्थितीत असलेल्या तालुक्यातील कोठारे ग्रामपंचायत मधील अतिदुर्गम भागातील थड्याचापाडा येथील पाणी योजना शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे आता सुरू होणार आहे. पाणी योजना असूनही विजेच्या समस्येमुळे पाणी दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने पाण्यासाठी दर्‍याखोर्‍यातून दोन अडीच किलोमीटर करावी लागणारी पायपीट करावी लागत आहे. शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी महावितरणच्या अभियंत्यांसोबत या भागात केलेल्या दौर्‍या दरम्यान येत्या पंधरा दिवसात विजेच्या समस्याचे निराकरण करण्यात येणार असल्याने थड्याच्यापाड्यातील महिला भगिनींच्या डोक्यावरील हंडा आता उतरणार आहे.

शहापूर तालुक्याच्या अतिदुर्गम भगत वसलेल्या थड्याचा पाडण्यासाठी स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना आहे. भातसा धरणाच्या खोर्‍यातून या पाड्यासाठी दोन ते अडीच किलोमीटर खोल दरीतून पाणीवर पम्पिंग करावे लागते. मात्र पंप हाऊस पर्यत विजेचा थ्रीफेज पुरवठा मिळत नसल्याने ही योजना बंद स्थितीत आहे. शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांसोबत थड्याचापाडा येथे भेट दिली.

थड्याचापाडा ते भातसा बॅक वॉटर पर्यत सुमारे दोन ते अडीच किलोमीटरवर पायपीट करत पंपहाऊसची पहाणी केली. या पाणी योजनेसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर येत्या 15 दिवसांत बसविण्यात येईल. महिलांची पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट थांबेल असे कटकवार यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच पाणीपुरवठा विभागाचे जाधव यांच्याशी देखील संपर्क साधून या योजनेची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशा सूचना केल्या. शिवसेनेच्या या प्रयत्नांमुळे तालुक्यातील थड्याचापाडा येथील महिला भगिनींची रणरणत्या उन्हात दोन – अडीच किलोमीटरची होणारी पायपीट आता थांबणार आहे.

First Published on: April 7, 2022 9:26 PM
Exit mobile version