कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीकडे ठाणे जिल्ह्याचे लक्ष

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीकडे ठाणे जिल्ह्याचे लक्ष

मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप मधील गटबाजीमुळे शिंदे गटाने 18 पैकी 15 जागांवर निर्विवाद बहुमत मिळविले आहे. तरी उद्या होणार्‍या सभापती पदाच्या निवडणुकीत माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मुरबाड नगरपंचायत वर भाजपची सत्ता येण्यासाठी आमदार किसन कथोरे आणि केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील हे मोठ्या जोमाने कामाला लागले होते. अखेर भाजपने निर्विवाद बहुमत मिळविले असले तरी खासदारांच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाल्याने त्यांचा हा पराभव जिव्हारी लागला. तेव्हापासुन आमदार किसन कथोरे व खासदारांमध्ये गटबाजीची ठिणगी पडली. याला उत्तर देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 28 एप्रिल रोजी पार पडली असताना या निवडणुकीत भाजपच्या गटबाजीमुळे शिंदे गटाला 18पैकी 15 जागांवर निर्विवाद बहुमत मिळाले. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मुरबाड नगरपंचायतचा वचपा काढण्यासाठी शिंदे गटाला मदत केली असल्याचा आरोप होत आहे. शिंदे गटाने 18 पैकी 15 जागांवर निर्विवाद बहुमत मिळविले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे गटाने 18 पैकी 15 जागांवर निर्विवाद बहुमत मिळविले असल्याने सभापती व उपसभापती हा आमच्याच गटाचा असणार आहे.
– कांतीलाल कंटे, तालुका प्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना.

कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपला सभापती विराजमान कसा होईल यासाठी अस्तित्वाची लढाई सुरू आहे.ते 18 मे रोजी सिध्द होईल.
– जयवंत सुर्यराव.अध्यक्ष, भाजपा, मुरबाड तालुका

First Published on: May 17, 2023 10:14 PM
Exit mobile version