पडघ्यातील रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा संपला; ११ रुग्णांना काढले बाहेर

पडघ्यातील रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा संपला; ११ रुग्णांना काढले बाहेर

राज्यात कोरोना रुग्णाचे प्रमान झपाट्याने वाढत आहे. अशात आता ऑक्सिजनची कमतरता जाणवु लागली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार सुरू ठेवून मंगळवारी रात्री दहानंतर रुग्णालयात ऑक्‍सिजनचा तुटवडा संपत चालला असल्याचे व्यवस्थापनाच्या लक्षात आले. किमान अकरा रुग्णांच्या नातेवाईकांना बोलावून तुमच्या रुग्णांवर आता ऑक्सिजन अभावी उपचार होणार नसल्याचे सांगितल्याने मध्यरात्री रुग्णांना हलवायचे कुठे हा प्रश्न पडला होता. मात्र येथील अकरा रुग्णांच्या नातेवाईकांनी कल्याण, डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ, मुंबई येथे रुग्ण उपचारार्थ हलवण्याची माहिती उजेडात आली आहे. मुंबई नाशिक हायवे रस्त्यावरील पडघा येथे श्री साई मल्टीस्पेशालिटी व ट्रामा सेंटर हस्पिटल असून येथील व्यवस्थापनाने कोरोना रुग्णांवर उपचार सुरू ठेवले होते.

 

मात्र मंगळवारी रात्रीच्या सुमारास अचानक ऑक्सिजनचे बाटले संपल्याचे लक्षात आल्याने सिरीयस असणाऱ्या किमान अकरा रुग्णांना तातडीने हलविण्याच्या सूचना नातेवाईकांना देण्यात आल्या आहेत. एकीकडे बहुतेक प्रायव्हेट रुग्णालये कोरोना रूग्णांनी हाउसफुल झाले असून शासकीय रुग्णालयांची देखील अशीच स्थिती असल्याने ऐन रात्रीमध्ये या हॉस्पिटल व्यवस्थापनाने रुग्ण हलविण्याचे सांगितल्याने नातेवाईकांच्या पायाखालची माती सरकू लागली. रात्री दीड नंतर कोरोना ऑक्सीजनवर असलेले रुग्ण त्यांच्या नातेवाईकांनी कार्डियो अॅम्ब्युलन्सची सोय करण्यासाठी धडपडू लागले. बहुतेकांनी या अॅम्ब्युलन्समधून रुग्णाने येथून काढता पाय घेतला.

 

या हॉस्पिटल व्यवस्थापकाने सायंकाळच्या सुमारास रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सीजन संपत असल्याचे सांगितले असते तर ऐन मध्यरात्री त्यांना धावपळ करायची गरज भासली नसती.तीन दिवसापूर्वी येथील ढिसाळ कारभाराचा फटका एका रुग्णाला बसल्याने वैतागलेल्या नातेवाईकांनी या रुग्णालयाच्या डॉक्टरांना मारहाण केल्याची माहिती मिळून आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच हे रूग्णालय सुरू केली असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.  मल्टीस्पेशालिटी नाव असणाऱ्या या रुग्णालयात रेमेडेसीवीर इंजेक्शन देखील मिळत नसून ते इंजेक्शन देखील बाहेरून आणायला सांगत आहेत. यासंदर्भात रुग्णालयाचे व्यवस्थापन रोशन पाटील यांना विचारणा केली असता ऑक्सिजनचा पुरवठा आमच्याकडे शिल्लक नाही. यामुळे आम्ही रुग्ण ॲडमिट करून घेत नसल्याचे सांगितले.

 

 

First Published on: April 15, 2021 6:24 PM
Exit mobile version