… तर आदिवासींच्या १२ आमदारांची व २ खासदारांची पदे रद्द करा

… तर आदिवासींच्या १२ आमदारांची व २ खासदारांची पदे रद्द करा

अनुसूचित क्षेत्राबाहेरील ३३ अन्यायग्रस्त जमातींना जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र द्या नाहीतर या आदिवासींच्या लोकसंख्येच्या बळावर झालेल्या १२ आमदारांची आणि २ खासदारांची पदे रद्द करा, अशा मागणीचा पुनरुच्चार विधान परिषदेतील आमदार रमेशदादा पाटील यांनी केला. ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) महाराष्ट्र जिल्हा शाखा ठाणे च्या वतीने कल्याण येथील नवरंग सभागृहात आयोजित समाज जोडो अभिमानांतर्गत आयोजित अन्यायग्रस्त आदिवासींचा महामेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑफ्रोहचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मध्य नागपूचे आमदार विकास कुंभारे, ऑफ्रोहचे राज्य कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मार्गदर्शक दिपक केदारे , राज्य उपाध्यक्ष प्रा. देवराम नंदनवार, मागासवर्गीय कृती समितीचे अध्यक्ष संजभाऊ हेडाऊ, महासचिव रुपेश पाल, राज्य कोषाध्यक्ष मनीष पंचगाम, प्रसिद्धी प्रमुख गजेंद्र पौनिकर, राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रभान सोनुने, महादेव बेदरे ओमप्रकाश कोटरवार, नरेश खापरे, कोळी समाजाचे नेते देवानंद भोईर, जिल्हाध्यक्ष दयानंद कोळी, ऑफ्रोह राज्य महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष अनघा वैद्य, उपाध्यक्ष प्रिया रामटेककर उपाध्यक्षा भारती धुमाळ, सदस्य कलावती डोमकुंडवार, वंदना सोनकुसरे, पुष्पा किटाडीकर, वनिता नंदनवार, उषा पारशे आदी उपस्थित होते.

आमदार रमेश पाटील पुढे म्हणाले की आजपर्यत जे कुणाला जमले नाही ते अशक्य कार्य ऑफ्रोहने करून दाखवले. 33 अन्यायग्रस्त जमातीची महाराष्ट्रभर फिरून अल्पावधीत मोट बांधण्याचे कार्य शिवानंद सहारकर यांनी करून दाखवले. ऑफ्रोहचे राज्याध्यक्ष ‘जादूगर’ आहेत या शब्दात सहारकर यांचे कौतुक केले.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बिरसा मुंडा व महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी आमदार विकास कुंभारे यांनी अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ऑफ्रोहच्या पदाधिकाऱ्यांची भेट घालून दिली.

ऑफ्रोहचे कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते यांनी जर आम्ही ‘बोगस’ असू तर आमची लोकसंख्या वगळून अनुसूचित जमातीचे विधानसभा व लोकसभा मतदारसंघ राखीव करावे, असे आव्हानच यावेळी दिले.
यावेळी कायदेशीर सल्लागार डॉ. दिपक केदारे, महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष अनघा वैद्य,कोळी समाज संघटनेचे देवानंद भोईर यांनीही मेळाव्याला संबोधित केले. ऑफ्रोहचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर यांनी अध्यक्षीय भाषणात अधिसंख्य कर्मचाऱ्यांना न्याय देणारा निर्णय घेतल्याबद्दल भाजप- शिंदे सरकारचे आभार मानले. याकामी आमदार गोपीचंद पडळकर,आमदार विकास कुंभारे, आमदार रमेश पाटील व अन्य काही आमदारांनी मोलाचे सहकार्य केल्याचे आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद कोळी, उपाध्यक्ष अर्जुन मेस्त्री, अशोक बुरडे, सचिव घनश्याम हेडाऊ, सहसचिव पांडुरंग नंदनवार, कोषाध्यक्ष नरेंद्र भिवापुरकर, सदस्य पिंजरकर, किशोर लिमजे, रविंद्र निमगांवकर तसेच महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखा पाटील, माजी अध्यक्षा स्मिता भोईर, नितु हेडाऊ, कोकण विभाग उपाध्यक्षा वंदना डेकाटे, शिला भिवापुरकर, जया गुमगावकर इ. अनेक बंधू भगिनींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात ठाणे जिल्हा व्यतिरिक्त नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक, पालघर, सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड इत्यादी जिल्ह्यातील पदाधिकारी व कर्मचारी बांधव सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रिया रामटेककर, घनश्याम हेडाऊ, अर्जून मेस्त्री यांनी उत्तमरित्या केले. आभार नरेश खापरे यांनी मानले.

First Published on: February 16, 2023 10:06 PM
Exit mobile version