त्या पॉझिटिव्ह रुग्णांनी आपली माहिती तात्काळ वॉर रूमला द्यावी

त्या पॉझिटिव्ह रुग्णांनी आपली माहिती तात्काळ वॉर रूमला द्यावी

शहरातील मेडिकल्स शॉपमध्ये कोव्हिड-१९ च्या चाचणीसाठी उपलब्ध असणाऱ्या सेल्फ टेस्टिंग किटच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांनी आपली माहिती तात्काळ वॉर रूमच्या +९१ ७३०६३ ३०३३० या क्रमांकावर कळविण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

शहरात कोविड -१९ चाचणी करण्यासाठी मेडिकल्स शॉपमध्ये उपलब्ध असणाऱ्या सेल्फ टेस्टिंग किटच्या माध्यमातून नागरिक परस्पर घरीच कोरोनाची चाचणी करत आहेत. परंतु चाचणी पॉझिटिव्ह आल्यास महापालिकेस न कळविता परस्पर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संपूर्ण माहिती वॉर रूमकडे असणे अत्यावश्यक आहे. तरी सेल्फ टेस्टिंग किटच्या माध्यमातून चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनी आपली माहिती +९१ ७३०६३ ३०३३० या क्रमांकावर संपर्क देण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.

First Published on: January 12, 2022 9:33 PM
Exit mobile version