मुलांची विक्री करण्याप्रकरणी महिला डॉक्टरसह तीन महिलांना पोलीस कोठडी

मुलांची विक्री करण्याप्रकरणी महिला डॉक्टरसह तीन महिलांना पोलीस कोठडी

उल्हासनगरात मुले विकणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी बुधवारी उशिरा रात्री अटक केली. त्यांना गुरुवारी कोर्टात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीत उल्हासनगरची महिला डॉक्टरचा समावेश असल्याने शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
उल्हासनगरात महिलांच्या प्रसुतीच्या नावाखाली महालक्ष्मी नर्सिंग होम या हाॅस्पिटलमध्ये डॉक्टर चित्रा जयप्रकाश चैनानी मुले विकण्याचा प्रकार करत होती. आता पर्यंत तीने किती मुले कोणाकोणाला विकली आहेत. याचा तपास पोलीस करत आहेत.

बुधवारी एका माहितीच्या आधारावर ठाणे गुन्हा अनवेषण विभागाचे पोलीस अधिकारी दिलीप पाटील यांनी त्यांच्या पथकासह अनिता पंदारे या महिलेला पुढे करून डॉ चैनानी यांच्या महालक्ष्मी नर्सिंग होममध्ये छापा मारला. या छाप्यात मुले घेणारी महिला एका पुरुष सोबत डॉ. चैनानी यांच्या कॅबिनमध्ये मुलाचा सौदा करताना पकडले गेले. यात सात लाखांची रोख रक्कम सापडली होती. ज्यांना मूल विकत घ्यायचे होते त्यांच्या कडून डॉ चित्रा चैनानी यांनी सात लाख रूपये घेऊन आपल्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवले होते. पोलिसांच्या अचानक पडलेल्या धाडीमुळे डॉ चैनानी आणि तिथे उपस्थित मुले विकत घेणाऱ्या महिला पळून जाण्याच्या तयारीत होत्या. परंतु पोलिसांनी त्यांना जागेवरच ताब्यात घेतले.

मुलांच्या दिसण्यावरून ठरवली जात होती किंमत

डॉ चैनानी ही वादग्रस्त डॉक्टर म्हणून कुप्रसिद्ध आहे. तिच्याकडे डॉक्टरची डिग्री बोगस असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तिने मुले विकण्याचा दर निश्चित केला होता. मुलगी असेल तर चार लाख आणि मुलगा असेल तर सात लाख, मुलगा देखणा गोरापान असेल तर किंमत अधिक वाढवण्यात येत होती. दरम्यान पोलिसांनी डॉ. चित्रा चैनानी, प्रतिभा राहुल मोरे, संगीता वाघ, गंगादेवी छुट्टन योगी आणि देवन्ना होणापा कमरेकर यांना मुलांचा व्यापार करताना पकडले. यात महिला आरोपी अधिक असल्याने शिवाय महिलांना रात्री अटक करण्यासाठी कोर्टाची परवानगी आवश्यक असते म्हणून त्यांना बुधवारी रात्री उशिरा कोर्टाच्या परवानगीने अटक करण्यात आली होती. गुरुवारी सर्व आरोपीना कोर्टात हजर केले असता कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शना खाली तपास सुरू आहे.

 

First Published on: May 18, 2023 7:40 PM
Exit mobile version