ठाणे महापालिकेचे दुचाकी रुग्णवाहिकांवरील लाखो रुपये धुळीस

ठाणे महापालिकेचे दुचाकी रुग्णवाहिकांवरील लाखो रुपये धुळीस

ठाणे महापालिकेचे दुचाकी रुग्णवाहिकांवरील लाखो रुपये धुळीस

कमी वेळात अपघाताच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आणि दाट वस्तीमधील रुग्णापर्यंत पोहचून त्यांच्यावर प्रथमोपचार करता यावेत, यासाठी ठाणे महापालिकेने बाइक ॲम्ब्युलन्सची संकल्पना आणली.  परंतु  या संकल्पनेकडे पालीकेचे पूर्णपने दुर्लक्ष होताना दिसत आहे.  सर्व सुवीधांनी सुसज्ज असलेल्या  या बाइक ॲम्ब्युलन्स रुग्णांच्या सेवेत असण्या ऐवजी त्या धूळ खात पडल्या आहेत. या नवीन कोऱ्या असणाऱ्या बाइक लोकमान्यनगर  महिला बचत गट इमारतीच्या झाडाझुडूपांत पडून असून त्या खराब होत आहेत. तरीही महापालिका यावर गंभीर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठाण्यातील लोकमान्यनगर पाडा नंबर एक येथे महिला बचत गटाची इमारत आहे. या इमारतीच्या परिसरात या दुचाकी ॲम्ब्युलन्स ठेवण्यात आलेल्या आहेत. अनेक महीण्यापासून या दुचाकी  ॲम्ब्युलन्स याच ठिकाणी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लाखो रुपये किंमंत असलेल्या या  दुचाकी ॲम्ब्युलन्सची अवस्था बिकट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास लवकरात लवकर प्रथमोपचार मिळाल्यास ती व्यक्ती वाचू शकते. वाहतूककोंडी झाली तरी दुचाकी ॲम्ब्युलन्स अपघाताच्या ठिकाणी जलदगतीने पोहोचू शकते. या बाईकमध्ये तीन प्रथमोपचाराच्या किटही आहेत. मात्र, महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे या बाइक ॲम्ब्युलन्सचा म्हणावा तसा उपयोग करण्यात आलेला नाही.

महिला बचत गटाच्या इमारतीमध्ये उभ्या करून ठेवलेल्या या दुचाकी ॲम्ब्युलन्स  झाडाझुडूपांत  धूळ खात असून सुकलेल्या वेलींनी त्या पूर्णपणे वेढल्या गेल्या आहेत. ठाणे महापलीकेच्या आरोग्य विभागाचे याकडे लक्ष नाही. स्मार्ट सिटी असलेली ठाणे महापालिका करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. या बाइक ॲम्ब्युलन्सचा म्हणावा तसा उपयोग करण्यात आलेला नाही. अनेक दिवस एका ठिकाणी उभ्या असलेल्या या  दुचाकी ॲम्ब्युलन्स परत वापरात आणायच्या झाल्यास त्यासाठी देखील अमाप खर्च होणार आहे. त्यामुळे बाईक ॲम्ब्युलन्स बाईक घेण्यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च हा धुळीस मिळाला आहे.

First Published on: March 24, 2021 8:02 PM
Exit mobile version