ठाण्यातून ४ कोटी रुपयांची व्हेल माशांची उलटी जप्त

ठाण्यातून ४ कोटी रुपयांची व्हेल माशांची उलटी जप्त

ठाण्यातून ४ कोटी रुपयांची व्हेल माशांची उलटी जप्त

ठाण्यात व्हेल माशाची उलटीची विक्री करण्यास आलेल्या दोघा तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांना ठाण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. यांच्याकडून तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखाच्या पथकाने केली आहे.

व्हेल माशाची उलटी ही समुद्रात तरंगणारे सोन म्हणून मानले जाते. औषध बनवण्यासाठीही याचा उपयोग होतो. यामुळे या उलटीला आंतरराष्टीय बाजारात करोड़ची किंमत आहे. या व्हेल माशाची उलटी विक्री करण्यास दोन जण ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिटच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने गुरुवारी सायंकाळी जुना जकात नाका, घोडबंदर रोड येथे सापळा लावला. यावेळी दोन संशयित इसम होंडा कंपनीच्या युनिकॉर्न मोटारसायकल वरून जात असताना पोलिसांना दिसले.

 

या दोघा दुचाकीस्वारांना पोलिसांनी अडवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ४ किलो १०० ग्रॅम इतकी समुद्रात आढळणाऱ्या व्हेल माशाची उलटी आढळून आली. मंगेश जावळे व नंदकुमार दाभोळकर असे या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या दोघा तस्करांना अटक करीत व्हेल माशाची उलटी व मोटारसायकल जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या उलटीची किंमत तब्बल ४ कोटी रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांना ठाणे न्यायालयाने ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक तपास ठाणे गुन्हा शाखा करत आहे.

 

First Published on: July 2, 2021 7:30 PM
Exit mobile version