बापरे! एका वर्षात २० बाळांची आई बनली २३ वर्षाची तरूणी, वाचा सविस्तर

बापरे! एका वर्षात २० बाळांची आई बनली २३ वर्षाची तरूणी, वाचा सविस्तर

बापरे! एका वर्षात २० बाळांची आई बनली २३ वर्षाची तरूणी, वाचा सविस्तर

आई होणं हा कोणत्याही महिलेसाठी आनंदाचा क्षण असतो. महिला गरोदर राहिली की ९ महिने ती महिला आपल्या पोटात एका जीवाला वाढवत असते. हे नऊ महिने त्या महिलेसाठी जरी सुखावणारे असले तरी ते तितकेच तिच्यासाठी त्रासदायक देखील असतात. मात्र रशियातून एक बातमी समोर येतेय ती म्हणजे रशियातील एका अत्यंत श्रीमंत कुटुंबातील एका महिलेने एका वर्षात तब्बल २० मुलांना जन्म दिला. आता ती २१ मुलांची आई असल्याचे सांगितले जात आहे. या मुलांची काळजी घेण्यासाठी १६ महिला ठेवल्या आहेत. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार ही महिला स्वत: या मुलांची काळजी घेण्यात व्यस्त असते. इतकेच नाही तर तिला आपले कुटुंब अजून मोठे बनवायचे आहे, असेही तिने सांगितले.

वयाच्या २३ व्या वर्षी २१ मुलांची आई बनलेली क्रिस्टीना ओजटर्क हिने सांगितले की, जेव्हा ती तिचा लक्षाधीश पती गॅलिपला भेटली तेव्हा त्यांनी एका मोठ्या कुटुंबाचे स्वप्न पाहिले. तिचा ५७ वर्षीय पती गॅलिपचे आधीच लग्न झाले होते. जॉर्जियाच्या भेटीदरम्यान तिची गॅलिपसह भेट झाली. क्रिस्टीनाने असेही सांगितले की, तिने २० मुलांची आई होण्यासाठी सरोगसीचा आधार घेतला. एक वर्षापूर्वी तिला एकच मूल होतं, परंतु त्यानंतर तिला आणखी २० मुले झाली. सरोगेटसाठी तिने साधारण १ कोटी ४२ लाख रुपये खर्च केले आणि त्यानंतर तिचे कुटुंब वाढत गेले.

या दाम्पत्याची या मुलांची देखभाल करण्यासाठी १६ लिव्ह-इनमध्ये असणाऱ्या महिला आहेत आणि दरवर्षी ते त्यांच्यावर साधारण ७० लाख खर्च करतात. क्रिस्टीनाने असे सांगितले की, ती नेहमीच आपल्या मुलांसह तिचा वेळ घालवते आणि एक आई ज्या प्रमाणे आपल्या बाळासाठी करते ते ती सर्वकाही करते. गॅलिप आणि क्रिस्टीना यांच्याकडे यापूर्वी सहा वर्षांची विक्टोरिया नावाच्या सहा वर्षांची मुलगी होती. तर गॅलिप आणि क्रिस्टीना यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये सरोगेटचा आधार घेऊन मुस्तफा या मुलाला जन्म दिला होता. यानंतर, तिला प्रत्येक गर्भधारणेसाठी सुमारे ८ लाख रुपये दिले आणि आता त्यांना ४ महिन्यांपासून १४ महिन्यांपर्यंत मुले आहेत.

क्रिस्टीना म्हणाली की, मी माझ्या गरोदरपणाची योजना आखत आहे, पण त्वरित नाही, कारण आत्ताच मला माझ्या मुलांबरोबर असणे आवश्यक आहे. तिच्या दिनचर्याबद्दल क्रिस्टीनाने असे सांगितले की, तिचा पूर्ण दिवस मुलांची काळजी घेण्यात नेहमी व्यस्त असल्याने तिचा दिवस कंटाळवाणा अजिबात जात नाही. मुले सहसा रात्री ८ च्या सुमारास झोपायला जातात आणि पहाटे ६ पर्यंत झोपतात, तर मोठी मुलगी व्हिक्टोरिया सकाळी ७ वाजता उठते, असे तिने सांगितले.


First Published on: June 5, 2021 2:49 PM
Exit mobile version