घरदेश-विदेश२५ वर्षीय तरूणीने एकाच वेळी ९ बालकांना दिला होता जन्म, महिन्याभरानंतर अशी...

२५ वर्षीय तरूणीने एकाच वेळी ९ बालकांना दिला होता जन्म, महिन्याभरानंतर अशी झाली परिस्थिती

Subscribe

गेल्या महिन्यात पश्चिम आफ्रिकेतील माली येथील महिलेची प्रसूती जगभरातील चर्चेचा विषय बनली होती. हलीमा नावाच्या २५ वर्षीय तरूणीने एकाचवेळी नऊ मुलांना जन्म दिला. प्रसूतीमध्ये काही अडचण आल्यामुळे मोरोक्कोमध्ये महिलेवर उपचार करण्यासाठी तेथील सरकारने विशेष व्यवस्था केली होती. जन्मानंतर या नऊ मुलांची प्रकृतीही गंभीर झाली होती. मात्र, आता असे सांगितले जात आहे की, ही नऊ मुलं अद्याप रूग्णालयात असली आणि त्यांच्यावर उपचार सुरू असले तरी या सर्व मुलांच्या आरोग्यात बरीच सुधारणा झाली आहे.

एका मलेशियन महिलेने ४ मे रोजी जन्म दिलेल्या नऊ मुलांची तब्येत उत्तम आहे, मात्र त्यांना अजून दोन महिने निरीक्षणाखाली ठेवणे आवश्यक आहे, असे मोरक्कोच्या रुग्णालयाने एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले ऐन बोरजा क्लिनिकचे प्रवक्ते अब्देलकोद्दस हाफसी म्हणाले की, सध्या ही नऊ मुले कोणत्याही वैद्यकीय उपकरणाशिवाय श्वास घेत आहेत. यापूर्वी त्यांना श्वास घेताना अडचण येत होती. त्यातून ते सर्व बरे झाले आहेत.

- Advertisement -

हाफसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांना ट्यूबद्वारे दूध पाजले जात आहे आणि त्यांचे वजन वाढून आता साधारण ८०० ग्रॅम ते १.४ किलो दरम्यान वाढले आहे. या ९ मुलांपैकी ५ मुली आणि ४ मुले आहेत. मुलांची आई त्यांच्यासोबत राहत आहे. या मुलांना कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय आयुष्य जगण्यास आणखी दीड ते दोन महिने लागतील, असेही हाफसी म्हणाले. ही प्रसुती १० डॉक्टर आणि २५ परिचारिकांच्या वैद्यकीय पथकाच्या मदतीने करण्यात आली होती. ३० मार्च रोजी माली सरकारने हलीमा यांना अधिक चांगल्या उपचारांसाठी मोरोक्को येथे पाठविले. सुरुवातीला, अल्ट्रासाऊंड अहवालात असे दिसून आले की हलीमाच्या पोटात सात मुले आहेत, परंतु प्रसूतीच्या वेळी डॉक्टरांना कळले की ते सात नव्हे तर नऊ बालकं आहेत. सात मुलांना यशस्वीरित्या प्रसूती करण्यात आलेल्या स्त्रियांचे प्रकरण फारच कमी आहेत आणि एकत्रितपणे सुरक्षितपणे नऊ मुलांना जन्म दिल्याची घटना देखील दुर्लभ असल्याचे सांगितले जात आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -