Botfly : बापरे ! अमेरिकन महिलेच्या डोळ्यातून काढल्या ३ जिवंत माश्या, भारतात यशस्वी शस्त्रक्रिया

Botfly : बापरे ! अमेरिकन महिलेच्या डोळ्यातून काढल्या ३ जिवंत माश्या, भारतात यशस्वी शस्त्रक्रिया

3 live flies botflies removed from the eye of an American woman at delhi hospital

Botfly : दिल्लीत एका रुग्णालयात एका महिलेच्या डोळ्यातून चक्क तीन जिवंत बोटफ्लाय (माशा)  ऑपरेशन करुन काढण्यात आल्या आहे. ही महिला अमेरिकेची नागरिक असून काही दिवसांआधी ती अॅमेझॉनच्या जंगलाच्या दौऱ्यावर गेली होती. तिथे मायियासिस हा एक दुर्मिळ, अगदी केसासारखा इन्फेक्शन प्रकार डोळ्यांच्या टिश्यूमध्ये आढळून आला. दिल्लीतील फोर्टीस रुग्णालयात या ३७ वर्षीय महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या ४-५ आठवड्यात महिलेच्या डोळ्यात काही तरी खुपत होते. तिने अमेरिकेतील डॉक्टरांकडे ट्रिटमेंट केली मात्र काही फरक पडला नाही. अखेर भारतात येऊन महिलेवर योग्य उपचार करण्यात आले.

शस्त्रक्रियेवेळी महिलेच्या डोळ्यातून २ सेमी आकाराच्या तिन माशा काढण्यात आल्या. महिलेला एनेस्थेशिया देऊन सर्व काळजी घेऊन १०-१५ मिनिटांत शस्त्रक्रिया पूर्ण झाली. महिलेला काही काळ ICU मध्ये डॉक्टरांच्या निगरणीखाली ठेवल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. मायियसिस मानव ऊतक असलेली लार्वा माशीचे संक्रमण झाले होते. हा माशा उष्णकटिबंधीय आणि उप उष्णकटिबंधीय क्षेत्रात आढळतात.

रुग्णालयाचे आपतकालीन विभागाचे प्रमुख डॉ. मोहम्मद नदीमने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मायियासिस हा फार दुर्मिळ प्रकार होता. अशा प्रकारात तात्काळ मूल्यांकन करण्याची गरज आहे.

अमेरिकन महिलेने दोन महिन्यांपूर्वी अँमेझॉन जंगलाचा दौरा केला होता. या प्रवासादरम्यान महिलेला संसर्ग झाल्याचा संशय आहे. प्रवासावरुन आल्यानंतर महिलेला तिच्या डोळ्यांच्या त्वचेमध्ये काही हालचाली जाणवायला सुरुवात झाली होती.


हेही वाचा – आजच्याचं दिवशी कृत्तक प्रक्रियेद्वारे ‘डॉली’ मेंढीचा झाला होता जन्म

First Published on: February 22, 2022 4:30 PM
Exit mobile version