कुत्रा- कुत्रीच्या लग्नाच्या मिरवणुकीत 500 वराती अन् सोन्या- चांदीच्या दागिन्यांचा श्रृंगार

कुत्रा- कुत्रीच्या लग्नाच्या मिरवणुकीत 500 वराती अन् सोन्या- चांदीच्या दागिन्यांचा श्रृंगार

उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये एक अनोखा विवाह सोहळा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. हमीरपूरच्या भरूआ सुमेरपूरमध्ये रविवारी दोन संतांच्या कुत्रा – कुत्रीचा विवाह सोहळा पार पडला. आपल्या पाळीव प्राण्यांचे लग्न लावून हे साधुसंत एकमेकांचे आता पाहुणे झाले आहेत. या लग्न सोहळ्याचे सर्व विधी हे हिंदू रीतिरिवाजानुसार पार पडले. इतकेच नाही तर अगदी थाटामाटात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे द्वारचर, भांवरे, कलेवाचे विधीही पार पडले. (Dog Bitch Marriage Ceremony Hindu Customs In Hamirpur Up)

सौंखर आणि सिमनौरी गावांच्या दऱ्याखोऱ्यात मनसर बाबा शिव मंदिर वसलेले आहे. या मंदिराचे महंत स्वामी द्वारकादास महाराज आहेत. त्यांनी आपल्या पाळीव कुत्रा कल्लूचा विवाह मौदाहा परिसरातील परच्छा गावातील बजरंगबली मंदिराचे महंत स्वामी अर्जुनदास महाराज यांचा पाळीव कुत्रा भुरीसोबत करून दिला.

रस्त्यावर उत्साहात निघाली कल्लू आणि भुरीच्या लग्नाची मिरवणूक

कल्लू आणि भुरीच्या लग्नासाठी 5 जून ही तारीख निश्चित करण्यात आली होती. या नियोजित तारखेनुसार द्वारका दास महाराज आणि अर्जुनदास महाराज यांनी त्यांच्या शिष्यांना आणि हितचिंतकांना या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करणारी पत्रिका पाठवली. यावेळी मनसर बाबा शिवमंदिर येथून कल्लू आणि भुरीच्या लग्नाची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक सौनखार गावातील रस्त्यावरून फिरली. यानंतर मिरवणूक मौदाहा परिसरातील परळच गावाकडे रवाना झाली. येथे बजरंगबली मंदिराचे महंत स्वामी अर्जुनदास महाराज यांनी मिरवणुकीचे भव्य स्वागत केले व स्वागतानंतर द्वारचार, चढ़ावा, भांवरों, कलेवा असे विधी पूर्ण करून थाटामाटात मिरवणूक पार पडली. (Dog Bitch Wedding)

कल्लू आणि भुरीला सोन्या – चांदीच्या दागिन्यांचा साज श्रृंगार

कुत्रा कल्लू आणि कुत्री भुरीला या लग्नासाठी सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या साज श्रृंगारासह नवीन कपडे घातले होते. तसेच वरातीतील पाहुण्यांसाठी विविध पदार्थ तयार करण्यात आले होते. हा अनोखा विवाह सोहळा संपूर्ण परिसरात एक चर्चेचा विषय ठरला होता. या मिरवणुकीत दोन्ही बाजूचे सुमारे 500 वराती सहभागी झाले होते.

कुत्रा आणि कुत्रीच्या लग्नापूर्वी दोन्ही पक्षांनी सर्व विधी पार पाडले. गेल्या आठवड्यात टिळक विधी पार पडला, त्यात 11 हजार रुपये रोख अर्पण करण्यात आले. 3 जून रोजी मंडप उभारला तेव्हा दोन्ही बाजूंनी चिकटचा विधीही पार पडला.


पावसाळ्यात फिरायला जायचा प्लॅन करताय? मग ‘हे’ आहेत मुंबईतील Best Places

First Published on: June 6, 2022 8:59 PM
Exit mobile version