आकाशात अडकले विमान, लँडिंग सुरु होताच असे काही घडले… पाहा व्हायरल व्हिडीओ

आकाशात अडकले विमान, लँडिंग सुरु होताच असे काही घडले… पाहा व्हायरल व्हिडीओ

चमत्कार या शब्दावर तुमचा विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचाही चमत्कारावर विश्वास बसेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांचा आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसला नाही. व्हिडिओमध्ये पाहिले तर जोरदार वाऱ्यामुळे एक विमान आकाशात झुलताना दिसले. यावेळी पायलटने विमान लँडिंग करताच असे काही घडले जे पाहून अनेकजण हैराण झाले.

लँडिंग दरम्यान घडले असे!

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जोरदार वाऱ्यामुळे विमानाच्या पायलटला लँडिंगमध्ये खूप अडचणी येत आहेत. तरीही विमान सुरक्षितपणे उतरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही सेकंदांनंतर एक गोष्ट घडली जी खरोखरच आश्चर्यकारक आहे. सगळ्यात आधी तुम्ही हा व्हायरल व्हिडीओ जरूर पहा…

थोडक्यात बचावले विमान

हे विमान वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने कसे जात आहे हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ज्यामुळे पायलटचेही विमानावरील नियंत्रण सुटत असल्याचे दिसते. मात्र एवढा त्रास होऊनही पायलटने प्रवाशांसह सुरक्षित लँडिंग केले. व्हिडिओचे दृश्य खरोखरच हृदय पिळवटून टाकणारे दिसते परंतु शेवटी सर्वकाही व्यवस्थित होते आणि कोणतीही दुर्घटना घडली नाही.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून लोकांच्या हृदयाचे ठोके नक्कीच वाढले असतील. अवघ्या 27 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी (सोशल मीडिया यूजर्स) पाहिला आहे. एवढेच नाही तर हजारो लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे.


या मराठमोळ्या अभिनेत्रींचा आहे बॉलिवूडमध्ये डंका

First Published on: October 2, 2022 8:03 PM
Exit mobile version