घरमनोरंजनया मराठमोळ्या अभिनेत्रींचा आहे बॉलिवूडमध्ये डंका

या मराठमोळ्या अभिनेत्रींचा आहे बॉलिवूडमध्ये डंका

Subscribe

बॉलिवूडमध्ये सुद्धा असे अनेक चेहरे आहेत. ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्रींपैकी लोकप्रिय असलेल्या या मराठमोळ्यांनी चेहऱ्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अशाच बॉलिवूडमधल्या मराठमोळ्या अभिनेत्रींपैकी जाणून घेऊ

माधुरी दीक्षित

- Advertisement -


बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील काळ गाजवणारी ‘धक धक गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने आणि निखळ सौंदर्याने बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली. माधुरीने आत्तापर्यंत जवळपास 70 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1984 साली माधुरीने ‘अबोध’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर हळूहळू माधुरीच्या यशस्वी कारकिर्दीला सुरूवात झाली.

सोनाली बेंद्रे

- Advertisement -


बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक मराठी अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे ही आहे. सोनालीने 1994 मध्ये ‘आग’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिच्या यशस्वी पर्वाला सुरूवात झाली. सोनालीने अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्यामध्ये सरफरोश, हम साथ साथ है, दिलजले, डुप्लीकेट, जिस देश में गंगा रहता है, हमारा दिल आपके पास है, लव के लिये कुछ भी करेगा, अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. तसेच सोनालीला 2 राष्ट्रीय पुरस्कार पद्मश्री आणि पद्म भूषणने सन्मानित करण्यात आले आहे.

उर्मिला मातोंडकर


मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरने 80 ते 90 दशकात बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली. उर्मिलाने 1980 च्या ‘कलयुग’ या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून तिच्या अभिनयाची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने 1991 मध्ये ‘नरसिम्हा’ चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने रंगीला, जुदाई आणि सत्या या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले होते. सध्या उर्मिला राजकारणातही सक्रिय आहे.

राधिका आपटे


सध्याच्या काळातील मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे. बॉलिवूड चित्रपटांशिवाय राधिका वेबसिरीजमध्ये देखील काम करत आहे. राधिकाने मराठीमध्ये ‘लयभारी’ चित्रपटामध्ये देखील काम केले होते. तसेच बॉलिवूडमध्ये तिने पॅटमॅन, विक्रम वेधा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मृणाल ठाकूर

मराठी चित्रपटांपासून ते हिंदी टेलिव्हिजन आणि बॉलिवूडपर्यंत आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या सीता रमन चित्रपटामुळे चर्चेत आहे. मृणालने आत्तापर्यंत बॉलिवूडमधील जर्सी, सुपर 30, धमाका यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाय मराठीमध्ये तिने ‘सुराज्य’ आणि ‘हॅलो नंदन’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.


हेही वाचा :

अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -