Viral Photo: पुराच्या पाण्यात भांड्यात ठेऊन नवजात चिमुकल्याला दिला पोलिओचा डोस

Viral Photo: पुराच्या पाण्यात भांड्यात ठेऊन नवजात चिमुकल्याला दिला पोलिओचा डोस

Viral Photo: पुराच्या पाण्यात भांड्यात ठेऊन नवजात चिमुकल्याला दिला पोलिओचा डोस

तुम्हाला वरचा फोटो पाहून आश्चर्य वाटलं असेल. या फोटोमधील नवजात चिमुकल्याला पोलिओचा डोस दिला जात आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोकं आरोग्य कर्मचारी महिलेचे खूप कौतुक करत आहेत. आज भारत जो पोलिओ मुक्त झाला आहे, तो असाच झाला नाही आहे. तर त्याच्यामागे अशा प्रकारे काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा हात आहे. जे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तसेच पूर परिस्थितीतही दोन हात करून लोकांच्या घराघरात जाऊन दो बूंद जिंदगी के म्हणजेच पोलिओचा डोस देत आहेत. माहितीनुसार हा फोटो पश्चिम बंगालमधील सुंदरबनमधील आहे. जिथे पाणी साचलेल्या परिस्थितीत आशा वर्कर मुलांना पोलिओ डोस देण्यासाठी पोहोचल्या होत्या. तिथल्याचे एका नवजात मुलाला भांड्यात ठेवून पोलिओचा डोस देण्यात आला.

या नवजात बाळाला पोलिओचा डोस देणाऱ्या आशा वर्करचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. ट्वीटरवर हा फोटो दिल्ली एम्सचे डॉक्टर योगीराज राय यांनी शेअर केला आहे. फोटोसोबत असे लिहिले आहे की, गंगाच्या डेल्टा सुंदरबनमध्ये पल्स पोलिओ लसीकरण. पाण्याने भरलेल्या भागात आरोग्य कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.

व्हायरल होत असलेल्या हा फोटोला आतापर्यंत २ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. ट्विटर युजर @skbadiruddinच्या माहितीनुसार, हा फोटो रविवारी सिंहेश्वर गावातून काढला होता. आई पुराच्या पाण्यात चालू शकत नव्हती. अशा परिस्थितीत नवजात मुलाला पोलिओ डोस देण्यासाठी वडील आपल्या बाळाला एका भांड्यात घेऊन पोहोचले होते. कारण आपल्या १५ महिन्याच्या बाळाला स्वतः उचलायला ते घाबरत होते.


हेही वाचा – REET Exam: कॉपीसाठी लाखमोलाची शक्कल, पायात घातली ६ लाखांची ब्लूटूथ चप्पल


 

First Published on: September 29, 2021 3:53 PM
Exit mobile version