PUBG बॅनवर ‘अमूल’ने साकारलं डूडल; सोशल मीडियावर होतंय व्हायरल

PUBG बॅनवर ‘अमूल’ने साकारलं डूडल; सोशल मीडियावर होतंय व्हायरल

भारत आणि चीनदरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चीनी मोबाईल अॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने हॅलो आणि टिकटॉकसह काही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता यामध्ये पब्जीगेमचा देखील समावेश आहे. पब्जी गेम हा गेम तरूणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र आता त्यावर बंदी आल्याने सोशल मीडिया पब्जीला बॅन केल्यावरून अनेक मीम्स देखील शेअर होऊ लागले आहेत. दरम्यान अमूलने पब्जी गेमसंदर्भात भन्नाट ट्विट करून तरुणाईमध्ये जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला आहे.

असे आहे अमूलचे डूडल

सोशल मीडियावर पब्जीवर अनेक व्हिडिओ, मीम्स व्हायरल झाले मात्र सर्वाचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे अमूलच्या डूडलने. आपल्या हटके डूडलसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अमूलने पब्जी बॅनवर एक डूडल प्रसिद्ध केले असून ते लोकांच्या पसंतीस उतरत आहे. अमूलच्या या डूडलमध्ये तीन मुलांना दाखवले आहे. यामध्ये एक मुलगी पब्जी खेळणाऱ्यांना रागवताना दिसते. ती म्हणते, “सब्जी? हा जी. पब्जी? ना जी!

अमूलच्या या डूडलवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी काही जणांनी हा गेम बॅन झाल्याबद्दल दुःख व्यक्त केल्याचे देखील दिसत आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत नवीन मल्टीप्लेअर मिड-कोअर गेम लाँच केला जाणार आहे. गेमचं नाव ‘फियरलेस एंड युनाइटेड: गार्ड्स (FAU: G)’ असेल. PUBG च्या चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र, या PUBG बॅन झाला म्हणून नाराज झालेल्यांना बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मल्टीप्लेअर अ‍ॅक्शन गेम FAU-G लाँच करणार आहे. यामधून २० टक्के महसूल ‘भारत के वीर’ ट्रस्टला देणार आहे.


PUBG App Ban: पब्जीला आहेत हे लोकप्रिय गेम्सचे पर्याय

First Published on: September 6, 2020 4:48 PM
Exit mobile version