Viral Video: अंतराळात रंगली पिझ्झा पार्टी

Viral Video: अंतराळात रंगली पिझ्झा पार्टी

Viral Video: अंतराळात रंगली पिझ्झा पार्टी

सर्वसामान्यांनी पिझ्झा खाणे ही सामान्य गोष्टी आहे. परंतु जर कोणी अंतराळात पिझ्झा पार्टी करत असेल तर यावर विश्वास बसेन थोडं कठीण आहे. सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) गेलेल्या अंतराळवीरांचा एक ‘फ्लोटिंग पिझ्झा नाईट’ पार्टीचा आनंद घेतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी अक्षरशः हैराण झाले आहेत.

दरम्यान अंतराळवीर थॉमस पेस्केटने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ISSवर असलेले अंतराळवीर अंतराळात कशाप्रकारे पिझ्झा पार्टी करत आहेत, हे पाहू शकता. हा व्हिडिओ शेअर करताना थॉमसने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, ‘मित्रांसोबत फ्लोटिंग पिझ्झा नाईट. पृथ्वीवरील शनिवारसारखे हे आहे. एक चांगला शेफ कधीही त्याचे रहस्य उघड करत नाही, परंतु मी एक व्हिडिओ बनवला आहे.’

दरम्यान Northrop Grumman ने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पुरवठा करण्यासाठी Cygnus Resupply Spacecraft लाँच केले होते. ज्यामुळे अंतराळात अंतराळवीरांसाठी पिझ्झाची स्पेशल डिलिव्हरीसोबत रवाना केले होते. यामुळे अंतराळवीरांना अंतराळात पिझ्झा खाण्याची संधी मिळाली.


हेही वाचा – Video Viral: बापरे बाप! तरुणीने सापालाच बनवला अंबाड्याचा चाप


 

First Published on: August 29, 2021 7:38 PM
Exit mobile version