घरट्रेंडिंगVideo Viral: बापरे बाप! तरुणीने सापालाच बनवला अंबाड्याचा चाप

Video Viral: बापरे बाप! तरुणीने सापालाच बनवला अंबाड्याचा चाप

Subscribe

महादेव शंकर भगवान यांचा साप हा लाडका प्राणी असल्याचे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिलेने भोले शंकर सारखा जटेत साप बांधल्याचे दिसून येत आहे. इतकेच नाही तर तिने या सापाचा वापर अंबाड्याचा चाप म्हणून केला आणि शॉपिंग केली. साप हा खूप भितीदायक प्राणी असून त्याला पाहूनच अर्ध्यांचा जीव जातो, पण असे काही लोक आहेत जे सापांना अजिबात घाबरत नाहीत. तुम्हाला सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ पाहायला मिळाले असतील, पण तुम्ही आज जो व्हिडीओ पाहणार आहात तो आश्चर्यकारक आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सादेखील काही काळ श्वास थांबला असणार हे नक्की…

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला शॉपिंग करत आहे आणि तिच्या केसाच्या आंबाड्याला तिने साप गुंडाळलेला आहे. हा साप पूर्णपणे हेअर बँड सारखा दिसतोय. मात्र हे कोणतेही हेडर बँड नसून तो खरा खुरा साप आहे. या व्हिडिओत जेव्हा कॅमेरा झूम केला जातो, तेव्हा ते हेअर बँड नसून साप असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सोशल मिडीयावर या महिलच्या व्हिडिओला नेटकरी पसंती देत असून त्यावर प्रतिक्रिया देखील करताना दिसताय.

बघा व्हायरल व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Snakes Mania (@snakes.mania)

- Advertisement -

सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे की अशा प्रकारे अजिबात वर्तवणूक करू नका. हा साप या महिलेचा पाळीव प्राणी आहे, त्यामुळे तो तिला दंश करत नाही, वास्तविक साप अतिशय धोकादायक आणि विषारी प्राणी आहे. सध्या हा व्हिडिओ खूप पसंत केला जात असून अनेक युजर्स यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. आतापर्यंत ९ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -