यंदा कर्तव्य आहे? ‘हे’ आहेत २०२१ मधील मुहुर्त

यंदा कर्तव्य आहे? ‘हे’ आहेत २०२१ मधील मुहुर्त

यंदा कर्तव्य आहे? हे आहेत २०२१ मधील मुहुर्त

कोरोनाच्या संकंटामुळे २०२०मध्ये लग्नाचे सगळे मुहूर्त रद्द झाले. ऐन लग्नाच्या मुहूर्तावर कोरोनाचे सावट आले. लग्नासराईच्या मोसमात लॉकडाऊनमुळे सगळी लग्ने पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे लग्न करणाऱ्या सगळ्या प्रेमीयुगुलांनमध्ये नाराजी निर्माण झाली. २०२१ हे वर्ष तरी चांगले जावे अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. २०२०मध्ये ठरलेली लग्न २०२१ मध्ये होणार ना याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. २०२१मध्ये विवाहच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे.

अनलॉकनंतर बऱ्याच जणांनी मोजक्या माणसांमध्ये लग्न समारंभ उरकून घेतले. काहीजण मात्र अजूनही चांगल्या मुहूर्ताची वाट बघत आहेत. नव्या वर्षांत तरी लग्नाचे चांगले मुहूर्त असतील आणि ठरलेल्या मुहूर्तीवर लग्न होतील अशी सर्वांची अपेक्षा आहे. चला तर पाहूयात २०२१मध्ये लग्न करणाऱ्यांसाठी लग्नाचे कोणते मुहूर्त आहेत.

२०२१मध्ये विवाहच्छुकांसाठी चांगले मुहूर्त असणार आहेत. मार्च, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे चार महिने वगळता बाकीच्या सगळ्या महिन्यात लग्नाचे चांगले मुहूर्त आहेत. त्यामुळे २०२० मध्ये लग्न मुहूर्तासाठी थांबलेल्यांना २०२१मध्ये चांगले मुहूर्त आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल, मे, जून, जुलै, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांमध्ये लग्नाचे अतिशय चांगले मुहूर्त आहेत. खासकरून मे महिन्यात लग्नाचे भरपूर मुहूर्त आहेत. त्यामुळे २०२१च्या मे महिन्यात लग्नांचे धुमधडाके पहायला मिळणार आहेत.

कोरोनाच्या काळात लोकांनी सगळ्या नियमांचे पालन करून लग्न केले. काहींनी कोर्ट मॅरेजला जास्त पसंती दिल्याचे दिसून आले आहे. अनलॉक नंतर हळू हळू सगळ्या सेवा पूर्वपदावर आल्यानंतर आता बरेच जण डेस्टिनेशन वेडिंगला सर्वात जास्त प्राधान्य देताना दिसत आहेत. २०२० मध्ये रखडलेली लग्न २०२१मध्ये बोहल्यावर चढणार असतील तर २०२१मध्ये त्यांच्यासाठी शुभ मुहूर्त आहेत.


हेही वाचा -  खुशखबर! जिओ ग्राहक घेणार आता फ्रि कॉलिंगचा आनंद

 

First Published on: December 31, 2020 10:27 PM
Exit mobile version