घरदेश-विदेशखुशखबर! जिओ ग्राहक घेणार आता फ्रि कॉलिंगचा आनंद

खुशखबर! जिओ ग्राहक घेणार आता फ्रि कॉलिंगचा आनंद

Subscribe

जिओने IUC (interconnect usage charges) पूर्णपणे बंद केले आहेत. त्यामुळे जिओच्या ग्राहकांना १ जानेवारीपासून कोणत्याही नेटवर्कला फ्रि कॉलिंग करता येणार आहे.

नवीन वर्षात जिओ ग्राहकांना खुशखबर आहे. देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी गिफ्ट दिले आहे. जिओच्या ग्राहकांना १ जानेवारीपासून फ्रि कॉलिंग सेवा मिळणार आहे. याआधी जिओ टू जिओ कॉलिंग सेवा फ्रि होती. मात्र आता संपूर्ण कॉलिंग सेवा हि फ्रि असणार आहे. २०२१ या नव्या वर्षात जिओच्या ग्राहकांना मोठे फिफ्ट दिले आहे. गुरूवारी जिओने याबाबत माहिती दिली.

जिओने IUC (interconnect usage charges) पूर्णपणे बंद केले आहेत. त्यामुळे जिओच्या ग्राहकांना १ जानेवारीपासून कोणत्याही नेटवर्कला फ्रि कॉलिंग करता येणार आहे. TRAI (Telecom Regulatory Authority of India) च्या निर्देशानुसार देशात १ जानेवारी २०२१ पासून Bill and Keep नियम लागू होणार असल्याचे सांगण्याता आले आहे. त्यामुळे आता IUC चार्ज संपणार आहे. जिओकडून इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी IUC चार्ज आकारला जात होता. यासाठी जिओ दर मिनिटाला १४ पैसे आकारत होती त्यानंतर ७ पैसे आकारले जात होते. मात्र हा ही कॉलिंग सेवा विनाशुल्क करण्यात आली आहे.

- Advertisement -

सप्टेंबर २०१९मध्ये जिओने IUC चार्ज आकारायला सुरूवात केली होती. त्यानंतर जिओने ट्राय IUC चार्ज संपवले त्यावेळी आम्ही ग्राहकांकडून IUC चार्ज आकारणार नाही असे स्पष्ट केले होते. मात्र आता १ जानेवारीपासून IUC चार्ज आकारले जाणार नाही असे जिओकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता नवीन वर्षात जिओच्या ग्राहकांना विनामूल्य कॉलिंग सेवेचा आनंद घेता येणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -