Viral Video: अद्भुत! पाण्यात वाहून जाणाऱ्या व्यक्तीला हत्तीच्या पिल्लानं दिलं जीवनदान

Viral Video:  अद्भुत!  पाण्यात वाहून जाणाऱ्या व्यक्तीला हत्तीच्या पिल्लानं दिलं जीवनदान

Viral Video: अद्भुत! पाण्यात वाहून जाणाऱ्या व्यक्तीला हत्तीच्या पिल्लानं दिलं जीवनदान

हत्तीला आपण एक विशालकाय प्राणी समजतो मात्र हत्ती हा खरचं एक समजुतदार प्राणी आहे. हत्तीचा हा समुजतदारपणा सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. पाण्यात वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीला हत्तीच्या पिल्लानं प्रसंगावधान दाखवत वाचवलं. हत्तीमुळे त्या व्यक्तीला जीवनदान मिळालं. एक गोंडस, सुंदर हत्तीचं पिल्लू सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नदीजवळ काम करता करता तोल जाऊन पाण्यात पडतो. किनाऱ्यावर उभ्या असलेल्या हत्तीला तो व्यक्ती पाण्यात बुडत असल्याचे जाणवते आणि तो इकडे तिकडे न पाहता पाण्यात उतरतो आणि वेगाने त्या पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीकडे जाणून आपल्या सोंडेने व्यक्तीला आधार देतो. पाण्यात बुडणारा व्यक्ती हत्तीच्या पिल्ल्याच्या पायाला धरुन किनाऱ्यावर येतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे माणूस आणि प्राण्यांमधील अद्भुत नाते पहायला मिळाले असे म्हटले जात आहे.


या व्हिडिओतून हत्तीच्या माणूसकीचे दर्शन पहायला मिळालं. साधारण माणूस पाण्यात पडला तर त्याला वाचवण्यासाठी माणसे धावून जातात. मात्र बुडणाऱ्या माणसाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी प्राणी धावून आला. हत्तीच्या पिल्लानं माणुसकीचं अप्रतिम उदाहरण घालून दिले आहे. नेटकऱ्याच्या देखील हा व्हिडिओ प्रचंड पसंतीस उतरला आहे.

हत्तीच्या पिल्लाचा हा व्हिडिओ dannyderaney या युझरने शेअर केला आणि अल्पावधीत व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओ शेअर केल्यापासून या व्हिडिओला आतापर्यंत १८ हजाराहून अधिक व्ह्यूज मिळालेत तर १३ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओ लाइल केलाय. हजारो कमेंट्स देखील व्हिडिओमध्ये पहायला मिळत आहेत.


हेही वाचा – कुत्र्याची ऐटीत गावभर ‘म्हैस राइड’; Video पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना

First Published on: December 22, 2021 9:26 PM
Exit mobile version