कुत्र्याची ऐटीत गावभर ‘म्हैस राइड’; Video पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना

A 'buffalo ride' across the village in the dog's attire; Netizens couldn't help but smile after watching the video,
कुत्र्याची ऐटीत गावभर 'म्हैस राइड'; Video पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना

कॉमेडियन सुनील ग्रोवर सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो.त्याने शेअर केलेले व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल होतात. त्यामुळे त्याचे सोशल मिडियावर बरेच चाहते आहेत. या फॅन फॉलोवर्ससाठी तो दररोज काहीना काही कंटेट सोशल मिडियावर पोस्ट करत असतो. त्याने नुकताच एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. ज्या व्हिडिओला पाहून नेटकऱ्यांना हसू आवरणे अवघड होऊन बसले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एखाद्या राजाप्रमाणे एक कुत्रा गावभर ऐटीत फिरत आहे. हा कुत्रा नुसता राजासारखा फिरत नाही तर तो म्हैस राइड करत आहे.राजेशाही रुबाबात म्हैशीच्या पाठीवर स्वार होऊन हा कुत्रा अगदी रुबाबात गावभर फिरत आहे. हा व्हिडिओ खूप जुना असून,अजूनही तो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती मिळत असून,नेटकऱ्यांना हसू आवरेनासे झाले आहे.या व्हिडिओला जवळजवळ ६ लाख ३० हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.याशिवाय या व्हिडिओवर अनेक कमेंट्ससुद्धा आल्या आहेत.

हा मजेदार व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस आला आहे. यावर अनेकांनी कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘कुत्रा चुकून म्हशीच्या खाली आला तर, त्याचा चक्काचुर होईल. अशा अनेक कंमेट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

 


हे ही वाचा – Corona Virus: चीनमध्ये कोरोनाची नवी भयंकर लाट, शियियान शहरात १.३ करोड लोकांना घरीच राहण्याचे आदेश