ऐकावं ते नवलंच! बोक्यामुळे महिला झाली प्रेग्नंट; नवराही झाला हैराण

ऐकावं ते नवलंच! बोक्यामुळे महिला झाली प्रेग्नंट; नवराही झाला हैराण

बोक्यामुळे महिला झाली प्रेग्नेट; नवराही झाला हैराण

आपली पत्नी चक्क बोक्यामुळे गरोदर असल्याचा धक्कादायक खुलासा एका व्यक्तीने केला आहे. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. मात्र, ही सत्य घटना असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावरील ‘रेडिट’वर एका युजरने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

काय म्हणाला टिफू?

टिफूने याबाबत पोस्ट शेअर करत सांगितले आहे की, ‘माझ्या घरातील बोक्यामुळे माझी पत्नी गरोदर झाली आहे. या जोडप्याला एक मुलगी असून हे दोघेही आनंदाने राहत होते. तसेच कोरोना संकच संपल्यावर ते दुसऱ्या बाळाचा देखील विचार करत होते. मात्र, अचानक आपली पत्नी गरोदर झाल्याचे समजल्याने आपल्याला धक्का बसला’, असल्याचे टिफूने सांगितले आहे. तसेच ‘आपली पत्नी काही काळ गर्भनिरोधक गोळ्या घेत होती. मात्र, या गोळ्यांचे सेवन करुन आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याने तिने त्या गोळ्या घेणे बंद केले होते. त्यामुळे त्यांनी कंडोम वापरण्यास सुरुवात केली. मात्र, कंडोम वापरुन देखील आपली पत्नी गरोदर झाल्याने आपल्याला धक्का बसल्याचे ते म्हणाले आहेत.’

पत्नीच्या गर्भधारणेचा रिपोर्ट केला असता तो पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे टिफूला धक्काच बसला. कंडोम वापरुन देखील आपली पत्नी गरोदर कशी झाली? याचा तो विचार करत होता. त्याचप्रमाणे या रिपोर्टवर दोघांचाही विश्वास बसत नव्हता. दरम्यान, टिफूने घरातील ड्रॉवरमधून कंडोमचे पाकिट बाहेर काढले. यानंतर, सर्व घटना उघडकीस आली. टिफूच्या घरातील बोक्याने कंडोमच्या पाकिटाला छिद्र केले होते. ही गोष्ट या जोडप्याला माहिती नव्हती आणि यामुळे लैंगिक संबंध दरम्यान कंडोम वापरुनही ही महिला गरोदर झाली असल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – Corona Fighter : कुटुंबाला गावी पाठवून दोन महिने राहिले एकटे!


First Published on: July 21, 2020 7:06 PM
Exit mobile version