Viral Video: कॅनेडीयन पंतप्रधानांच्या ‘या’ स्टाईलवर नेटकरी फिदा!

Viral Video: कॅनेडीयन पंतप्रधानांच्या ‘या’ स्टाईलवर नेटकरी फिदा!

Viral Video: कॅनेडीयन पंतप्रधानांच्या 'या' स्टाईलवर नेटकरी फिदा!

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो देशातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीबद्दल माहिती देत आहेत. हा व्हिडिओ कोरोनाची माहिती देत असल्यामुळे व्हायरस होत नसून त्यांच्या स्टाईलमुळे होत आहे. त्यांच्या केस नीट करण्याच्या स्टाईलमुळे ते चर्चेत आले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो घरून काम करत आहेत. ते नेहमी आपल्या घरातून मीडियाच्या लोकांशी बातचित करत असतात. नुकतच त्यांनी देशातील छोट्या व्यवसायांना आर्थिक पाठबळ देणार असल्याचे जाहीर केले. याच दरम्यान पत्रकार परिषदेत जोराचा वारा आला आणि त्याचे केस विस्कटले. त्यामुळे त्यांनी त्यावेळी लगेच केस नीट केले. त्याच्या याच केस नीट करणाच्या स्टाईलवर नेटकरी फिदा झाले आहेत. सोशल मीडियावरील या व्हिडिओवर प्रतिक्रियेचा पाऊसच पडत आहे.

फेसबुकवर या व्हिडिओला ५० लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर देखील व्हायरल होत आहे. एक युझरने, जगातील सर्वात हॉट राजकारणी असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या युझरने त्यांना हेअर कटची गरज नसल्याचे म्हटले आहे.


हेही वाचा – CoronaVirus: कोरोनावर मात केल्यानंतर बॉलिवूडचे मोरानी कुटुंब करणार रक्तदान


 

First Published on: April 22, 2020 2:14 PM
Exit mobile version