Corona Vaccine: लँसेंटच्या अभ्यासात समोर आलेत कोविशिल्ड लसीचे ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

Corona Vaccine: लँसेंटच्या अभ्यासात समोर आलेत कोविशिल्ड लसीचे ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

Corona Vaccine: लँसेंटच्या अभ्यासात समोर आलेत कोविशिल्ड लसीचे 'हे' दुष्परिणाम, जाणून घ्या

देशात १ मे पासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होत आहे. या टप्प्यात देशातील १८ वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार आहे. भारतात सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसी देण्यात येत आहेत. दोन्ही लसी घेतल्यानंतर लोकांना लसीचे दुष्पपरिणाम दिसून येत आहे. लसीचे दुष्परिणाम हे ४ पैकी एका व्यक्तील दिसून येत आहे. ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाची लस म्हणजेच कोविशिल्ड लस ज्याचे उत्पादन पुण्यातील सीरम इंन्स्टिट्यूट करत आहे. लसींचे दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी द लँसेंटनेकडून एक रिसर्च करण्यात आला. या रिसर्चमध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीच्या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यात आला.

लँसेंटने लसीचे दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी लंडनच्या किंग्स कॉलेचमध्ये रिसर्च केला. ८ डिसेंबर ते १० डिसेंबरपर्यंत हा रिसर्च करण्यात आला. या रिसर्चमध्ये एकूण ६ लाख २७ हजार ३८३ लोकांचा समावेश होता. किंग्स कॉलेजच्या प्रोफेसर आणि वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ५० वर्षाच्या लोकांना लस घेतल्यानंतर त्यांना फार सौम्य लक्षणे दिसून आली. तर ५५ वर्षांवरील महिलांमध्ये लस घेतल्यानंतर जास्त दुष्परिणाम समोर आले. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर १२ ते २१ दिवसात इंन्फेक्शन रेट हा ३९ टक्क्यांनी कमी झाला. तर याचवेळी फायझरची कोवॅक्सिन लसीचा इन्फेक्शन रेट ५८ टक्क्यांनी कमी झाला. २१ दिवसांनंतर कोविशिल्डचा इन्फेक्शन रेट ६० टक्के आणि फायझर ६९ टक्क्यांनी कमी झाला.

लँसेंटने लसीचे दुष्परिणामावर केलेल्या रिसर्चमध्ये असे म्हटले आहे की, लस कोणतीही असो ती घेतल्यानंतर लोकांमध्ये सौम्य लक्षणे दिसतातच.

या रिसर्चवर टिम स्पेक्टर यांनी असे म्हणले आहे की, कोणतीही लस घेतल्यानंतर तिचे जाणवणारे दुष्परिणाम हे खूप सामान्य आहेत. त्यामुळे लस घेण्यासाठी घाबरु नका. आवर्जून लस घ्या.


हेही वाचा – Pfizer Pill: लसीसोबत मिळणार गोळीचाही पर्याय, घरीच करा कोरोनावर मात, Pfizer आणतेय गोळ्या

First Published on: April 29, 2021 11:31 AM
Exit mobile version