CoronaVirus – भरधाव वेगाने जाणाऱ्या तरूणाला पोलिसांनी अडवले तर म्हणाला, कोरोना झालाय!

CoronaVirus – भरधाव वेगाने जाणाऱ्या तरूणाला पोलिसांनी अडवले तर म्हणाला, कोरोना झालाय!

कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे अनेक देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे घराबाहेर पडायला, रस्त्यावर फिरायला बंदी घालण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिस वेळोवेळी कारवाई करत आहेत. भारतात तर उगाच घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांच्या काठीचाच प्रसाद खायला मिळतो आहे. परदेशात पण भारतापेक्षा काही वेगळी स्थिती नाहीये.

लॉकडाउनमुळे रस्ते रिकामे असल्याने लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत बाहेर फेरफटक्यासाठी येत वेगाने गाड्या चालवणाऱ्यांचे प्रमाण परदेशामध्ये वाढल्याचे चित्र दिसत आहे. असाच एक विचित्र प्रकार ऑस्ट्रेलियामध्ये समोर आला आहे. लॉकडाऊनमुळे वाहतूक पोलिस आपल्याला अडवणार नाहीत असं सिडनीतील एका तरूणाला वाटलं त्यामुळे तो आपली लॅम्बॉर्गिनी घेऊन भरधाव वेगाने रस्त्यावरून निघाला. ज्या रस्त्यावर कमाल वेग मर्यादा ही ९० किमी प्रती तास आहे त्या रस्त्यावर हा तरुण १६० किमी प्रती तास वेगाने गाडी चालवत होता. पण पोलिसांनी त्याला अडवलं. पण यावेळी तरूणाने दिलेलं उत्तर ऐकून पोलीस चक्रावलेच. कारण तो तरूण म्हणाला, मला करोना झाला असून मी रुग्णालयामध्ये कोरोनाची चाचणी करण्यासाठी जात आहे.

तुम्हाला कोरोनाची लक्षणं असल्यासारखं वाटत असेल आणि डॉक्टरांची भेट घ्यायची असेल किंवा रुग्णालयामध्ये भरती व्हायचं असेल तर फोन करुन त्यासंदर्भातील माहिती रुग्णालयामध्ये द्या. खूपच आपातकालीन परिस्थिती असेल तर थेट ट्रीपल झिरो या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क करा, असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रोबॉय यांनी केलं आहे.

कॅनडातही तीच गत…

कॅनडामधील उत्तर ओकानागण जिल्ह्यातील पोलिसांनी यासंदर्भात इशारा देणारं ट्विटही केलं आहे. “कोविड-१९ हे गाडी ५० किमी प्रती तास वेगापेक्षा अधिक वेगाने चालवण्याचं कारण असू शकत नाही. आपण सर्व सुरक्षित राहुयात. आधीच आपल्याकडच्या रुग्णालयांवर कामाचा ताण आहे,” असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

First Published on: April 7, 2020 7:04 PM
Exit mobile version