डबल चीन कमी करण्यासाठी करा ‘हे’ योगा स्टेप फॉलो, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी

डबल चीन कमी करण्यासाठी करा ‘हे’ योगा स्टेप फॉलो, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी

डबल चीन कमी करण्यासाठी करा 'हे' योगा स्टेप फॉलो, चेहऱ्यावरची चरबीही होईल कमी

भारत देशाला योगा (Yoga)ही अशी अमुल्य देणगी लाभली आहे. या योग साधने द्वारे आपण शारिरीकच नाही तर मानसिकरित्या सुद्ध स्वत:ला सृधृड ठेऊ शकतो. पण या योगसाधनेचा उपयोग व्यक्तीने सातत्याने करायला हवा तरच त्याचे परिणाम दिसू लागतात. योगसाधना करून डबल चीन (Double Chin)देखिल कमी करु शकतो अनेकदा व्याक्तीला डबल चीन असल्याने त्याचा स्वत: वर असलेला कॉन्फीडन्स कमी होतो तसेच अनेकदा त्याला असे वाटू लागते की डबल चीन मुळे चेहऱ्याचं सौंदर्य खराब होतं. मात्र, आता डबल चीन सर्वसामान्य समस्या बनलेली आहे. तब्येत कमी असली तरी, डबल चीनची समस्या उद्भवू शकते. वजन वाढलं (Weight Gain) तर, मग आणखीन त्रास होतो. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. त्यात यशही येतं पण, डबल चीन लवकर जात नाही.

डबल चीन म्हणजे काय?

व्यक्तीच्या गळ्या जवळच्या भागात रक्तभीसरण कमी (Blood circulation) झाल्याने डबल चीन होते. जर या भागात ब्लडसर्क्युलेशन वाढलं तर डबल चीन जाऊ शकते. पण योगा डबल चीनसाठी कसा उपयोगी ठऱतो हे पाहूया.बाजारपेठेत मिळणाऱ्या हजारो गोळ्या औषधांचा वापर करुनही अनेकांना काहीच ऊपयोग होत नाही पण पुढे सांगितलेल्या योगा मुळे तुम्हाला हमखास याचा फायदा होईल याची खात्री आहे.

डबल चीन कमी करण्यासाठी योगा केल्याने फायदा होतो.

फोटो काढतांना आपण जसा तोडांने पाऊट करातो तसा पाऊट करावा. त्यासाठी आपला गळा आतल्या बाजूला खेचावा. 30 सेकंद याच स्थितीत रहा. त्यानंतर रिलॅक्स व्हा. 3 ते 4 वेळा हिच क्रिया करा.

गळ्यावरची चरबी कमी करायची असेल तर, आणखी एक सोपा उपाय आहे. आपली हनूवटी वर उचलून वरच्या बाजूला बघा. त्यानंतर आपल्या तोडांची उघडझाप करा. ही व्यायाम 10 ते 15 मिनीटं करा. त्यानंतर सावकाश आपली मान नॉर्मल स्थितीत आणा. चरबी कमी करण्यासाठी 3 ते 4 वेळा हिच क्रिया करा.

डबल चीन कमी करण्यासाठी योगासन चांगलं आहे. त्यासाठी तोंडात हवा भरा आणि चुळ केल्या प्रमाणे क्रिया करा. डाव्या आणि उजव्या बाजूला, वरखाली करा. ही क्रिया 20 ते 30 सेकंद करा. त्यानंतर रिलॅक्स व्हा. पुन्हा 3 ते 4 वेळा करा.

चेहऱ्यावरची चरबी कमी करण्यासाठी आणि तमाव कमी करण्यासाठी हे योगासन उत्तम आहे. यासाठी पाय दुमडून बसा आपले हात मांडीवर ठेवा. पाठ ताठ ठेवा. आपली जिभ जेवढी शक्य असेल तेवढी बाहेर काढा. पण, स्नायूंवर जास्त दबाव पडणार नाही याची काळजी घ्या. श्वास घ्या, श्वास सोडा. ही क्रिया 6 ते 7 वेळा करा.


हे हि वाचा – Yoga Day 2021:कोरोना काळात योग ठरला आशेचा किरण, योग दिनानिमित्त पंतप्रधानांचा देशवासियांशी संवाद

First Published on: June 21, 2021 9:56 AM
Exit mobile version