फेसबुकच्या पोस्टवर आता लाइक्स दिसणार नाहीत

फेसबुकच्या पोस्टवर आता लाइक्स दिसणार नाहीत

फेसबुकच्या पोस्टवर आता लाइक्स दिसणार नाहीत

फेसबुकच्या पोस्टवर समोरच्या व्यक्तीला किती लाईक्स मिळाल्या आहेत, हे आता युजर्सला पाहता येणार नाहीत. फेसबुकवर सुरु असलेल्या लाइक-वॉरवर तोडगा काढण्यासाठी फेसबुकने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बऱ्याचदा फेसबुकवर इतरांपेक्षा कमी लाइक्स मिळाले म्हणून लोक नाराज होतात. आपल्यालाही मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळाव्या म्हणून लोक विविध प्रकारच्या पोस्ट टाकून प्रयत्नांची पराकष्ठ करतात. मात्र, तरीही लाइक्स मिळाले नाहीत, तर काही लोक फार दु:खी होतात. त्यामुळे आता एका युजर्सने टाकलेल्या पोस्टच्या लाइक्स तो युजर्स वगळता इतर कोणत्याही युजर्सला पाहता येणार नाहीत.


हेही वाचा – …म्हणून दिल्लीतील टॅक्सी ड्राईव्हर सोबत ठेवतात ‘कंडोम’!


 

सर्वात अगोदर ऑस्ट्रेलियात पहायला मिळाला बदल

फेसबुकने लाइक्सच्या बाबतीत घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर हा बदल सर्वात अगोदर ऑस्ट्रेलियामध्ये बघायला मिळाला. २७ सप्टेंबरपासून हा बदल ऑस्ट्रेलियामध्ये पहायला मिळत आहे. त्यापाठोपाठ अजून कोणत्याही भागातून अशाप्रकारचे बदल झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, सर्वच ठिकाणी हे बदल पाहायला मिळतील, अशी माहिती समोर येत आहे. फक्त पोस्ट टाकणाराच आपल्याला आलेल्या लाइक्स आणि प्रतिक्रिया पाहू शकेल. मात्र इतर युजर्सला त्या प्रतिक्रिया देखील दिसणार नाहीत.


हेही वाचा – तुमचा व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिन असा आहे का? याने मेंबर्सला पार्टी दिली…


 

‘ही एक चाचणी’

फेसबुकने या बदलवर स्पष्टीकरण दिले आहे. फेसबुकवर लाइक्सच्या स्पर्धा किंवा युद्ध व्हावे असे आम्हाला वाटत नाही. हा एक प्रयोग असून लोक याकडे कोणत्या दृष्टीकोनाने पाहतात किंवा लोकांचा प्रतिसाद कसा असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. याशिवाय हा बदल संपूर्ण जगातील युजर्ससाठी अंमलात आणता येईल का? याची देखील चाचपणी सुरु असल्याचे फेसबुकने म्हटले आहे.


हेही वाचा – Video : सापासोबत खेळणं पडलं महागात

First Published on: September 27, 2019 4:50 PM
Exit mobile version