Covid-19: मुंबई पोलिसांची ४ कोटींची वसूली, ट्विटरकर म्हणतात ९६ कोटी बाकी!

Covid-19: मुंबई पोलिसांची ४ कोटींची वसूली, ट्विटरकर म्हणतात ९६ कोटी बाकी!

Covid-19: मुंबई पोलिसांची ४ कोटींची वसूली, ट्विटरकर म्हणतात ९६ कोटी बाकी!

राज्यात एका बाजूला कोरोना प्रादुर्भाव वाढत असला तर दुसऱ्या बाजूला सचिन वाझे प्रकरणाचा गुंता वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक कडक निर्बंध लागू केले जात आहे. मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग यावर अधिक भर दिला आहे. कोरोना नियम उल्लंघन करणाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत मास्क न लावणाऱ्यांकडून ४ कोटींहून अधिक दंड वसूल केल्याचे समोर आले. ट्विटरकरांनी हेच कनेक्शन वाझे प्रकरणाशी जोडले आहे. ते कसे पाहा..

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला १०० कोटींची खंडणी वसूल करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप केला. याचा संदर्भ घेऊन ट्विटरकरांनी अजून ९६ कोटी दंड वसूल करण्याचे बाकी असल्याचे म्हणाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेला मुंबई पोलीस दलाच्या पीआरओने दिलेल्या माहितीनुसार, मास्क न वापरणाऱ्या २ लाख ३ हजार लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ४.०६ कोटी रुपये पोलिसांनी वसूल केले. पण अजून १०० कोटी वसूल करायचे असून ९६ कोटी वसूली बाकी असल्याचे ट्विटरकरांनी सांगितले आहेत. तसेच काही जणांनी हे रिट्विट करून अनिल देशमुख यांना आपले ट्विट टॅग केले आहे.

पाहा काय म्हणाले ट्विटर युजर्स?


हेही वाचा – Coronavirus Vaccination Update: कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल स्थानावर!


 

First Published on: March 25, 2021 12:06 PM
Exit mobile version